PF Interest Rates | मोदी सरकारकडून PF व्याजदरात घट; ‘या’ 5 योजनेतून होईल मोठा फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PF Interest Rates | केंद्रातील मोदी सरकारकडून (Modi Government) भविष्य निर्वाह निधीच्या (Provident Fund-PF) व्याजदरात कपात (PF Interest Rates) केली आहे. हा निर्णय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या EPF बैठकीत घेण्यात आला आहे. या आगोदर तो व्याजदर 8.5 टक्के होता, तो आता 8.1 टक्के केला आहे. हा सर्वात कमी मानला जातो. आता सरकारने 2021-22 साठी ईपीएफवर 8.1 टक्के व्याजदर ठेवण्यासही मान्यता दिली आहे.

 

1977-78 मध्ये ईपीएफओने 8 टक्के व्याज दिले होते. तेव्हापासून ते 8.25 टक्के अथवा त्याहून जादा आहे. ईपीएफओची दोन दिवसीय बैठक 11 मार्च रोजी सुरू झाली होती. जी 12 मार्च रोजी संपली. या बैठकीत ईपीएफचे व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर याचा योग्य फायदा म्हणजे 5 गुंतवणूकीचे पर्याय आहेत जे तुम्हाला मजबूत परतावा मिळवून देऊ शकतात. याबाबत सविस्तर जाणून घ्या. (PF Interest Rates)

 

– पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) 
पीपीएफमध्ये 7.1 टक्के दराने व्याज दिले जातेय. याची तुलना स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) किंवा आयसीआयसीआयशी (ICICI Bank) केली तर समजेल की याठिकाणी तुम्हाला एफडीवर अधिकाधिक 6 टक्के व्याज मिळणार आहे. त्याचबरोबर PPF मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला कमीतकमी एक टक्के जादा परतावा मिळणार आहे. त्याचबरोबर, बँक एफडीमधून (FD) मिळालेले व्याज करपात्र आहे, तसेच, पीपीएफमधून मिळालेल्या व्याजावर कर आकारला जात नाहीये, पीपीएफमध्ये वार्षिक कमीतकमी 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. यात गुंतवणूक करताना लक्षात ठेवा की त्याचा कालावधी 15 वर्षांचा असतो.

– सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) 
यामध्ये पालक 10 वर्षांपर्यंतच्या मुलीच्या नावावर खाते सुरू करु शकतात, जे किमान 250 रुपयांपासून सुरू करता येते. आर्थिक वर्षातील कमीतकमी ठेव 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये निश्चित केलीय. व्याज दराबद्दल बोलायचे झाले तर, सध्या पोस्ट ऑफिस (Post Office) मधील सुकन्या समृद्धी योजना खात्यावर वार्षिक 7.6 टक्के व्याज मिळतेय. या योजनेत अधिकाधिक 15 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. या योजनेत जमा केलेल्या रकमेवर कलम 80 सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर कपातीचा दावा केला जाऊ शकतो. तसेच, ठेव रकमेवर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यावर मिळणारे पैसेही करमुक्त आहेत.

 

– किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) 
किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) किमान 1 हजार रुपयात मिळू शकते आणि कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाहीये. केव्हीपीवर सध्या वार्षिक 6.9 टक्के दराने व्याज मिळते. तसेच, या व्याजदरासह तुमचे पैसे 124 महिन्यांच्या कालावधीत (10 वर्षे आणि 4 महिने) दुप्पट होतील. किसान विकास पत्र जारी केल्यानंतर अडीच वर्षांनी कॅश केले जाऊ शकते. ते कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून घेतले जाऊ शकते. तुम्हाला किसान विकास पत्रामध्ये नामांकनाची सुविधाही मिळते. हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आणि एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसात सहजपणे हस्तांतरित केले जाऊ शकते. या योजनेअंतर्गत कितीही खाती उघडता येतात. असा याचा फायदा होतो.

 

– राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Savings Certificate) 
यात मॅच्युरिटी कालावधी पाच वर्षांचा आहे आणि सध्या त्यावर 6.8 टक्के व्याजदर मिळतेय.
अथिकाधिक गुंतवणुकीची मर्यादा नसून कोणीही एनएससीमध्ये किमान 1 हजार रुपयात गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकणार आहात.
NSC मध्ये एकट्याने अथवा संयुक्तपणे गुंतवणूक करता येते. यात केलेल्या गुंतवणुकीला कलम 80 सी अंतर्गत कर सूटही मिळतेय.
एनएससी मुदतीपूर्वी रोखता येत नसले तरी, एकाच खातेदाराच्या मृत्यूच्या बाबतीत/संयुक्त खात्याच्या बाबतीत,
एकट्याने अथवा सर्व खातेधारकांच्या बाबतीत ते केले जाऊ शकते.
तसेच, राजपत्रित अधिकारी अथवा न्यायालयाच्या आदेशानंतरही एनएससीच्या मुदतपूर्व रोखीकरण करण्यास परवानगी आहे.

 

– राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension Scheme) 
18 ते 70 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती राष्ट्रीय पेन्शन योजनेत (National Pension Scheme) खाते उघडू शकते.
याच्या लोकप्रियतेचे कारण म्हणजे ती अधिकाधिक परतावा देत आहे. या योजनेतील नवीन गुंतवणूकदार आता इक्विटीमध्ये 75 टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करू शकतात.
यात 8 ते 10 टक्के परतावा मिळू शकतो. पीएफआरडीएचे अध्यक्ष सुप्रतीम बंदोपाध्याय (Supratim Bandopadhyay) यांच्या मते,
एनपीएसने मागील 12 वर्षात लोकांना चांगला परतावा मिळवून दिलाय.

 

Web Title :- PF Interest Rate | pf interest rate slashed by modi government do not worry these 5 investment options can get you good returns

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | मोदी सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ एकाच अटीवर वेतनाशिवाय मिळतील 30 हजार रुपये; जाणून घ्या

 

Maharashtra 12th Result 2022 | 12 वी बोर्डाचा निकाल ‘या’ तारखेला लागण्याची शक्यता; विद्यार्थी-पालकांची उत्सुकता शिगेला

 

Kirit Somaiya On Uddhav Thackeray | ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादला आमदार विकत घ्यायला चाललेत का?’ – किरीट सोमय्या