Phone Tapping Case | मला आजही भीती वाटते कुणाशी कसं…; फोन टॅपिंग प्रकरणावर एकनाथ खडसेंचे सभागृहात विधान

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन | राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी (Phone Tapping Case) राज्याचे राजकारण चांगलेच तापले होते. तसेच नुकताच याबाबत मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) तसेच सायबर पोलिसांकडे (Cyber Police) दाखल असलेल्या या प्रकरणात शासनाने परवानगी नाकारल्याने आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांना दिलासा मिळाला होता. त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद आमदार (NCP MLA) एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी या प्रकरणावर (Phone Tapping Case) राज्य सरकारची कानउघडणी केली. ते आज विधानपरिषदेत बोलत होते.

एकनाथ खडसे म्हणाले, ‘मी प्रसारमाध्यमांमध्ये पाहतोय की रश्मी शुक्ला यांची फोन टॅपिंग प्रकरणात (Phone Tapping Case) राज्य सरकारने चौकशी केली, त्याचा अहवाल न्यायालयात सादर केला होता. न्यायालयाने तो अहवाल फेटाळला आणि याची परत चौकशी करण्याचे आदेश दिल्याचेही मी वर्तमानपत्रात वाचलं आहे. मला याबाबत माहिती हवी आहे की, रश्मी शुक्ला यांनी ज्यावेळेस यामध्ये फोन टॅप केले.

माझाही फोन ६८ दिवस टॅप केला आणि आता त्यामध्ये सरकार परत चौकशी करणार आहे. मला आपल्याला विनंती करायची आहे की, एकतर माझ्यासारख्याचा फोन टॅप करणे, म्हणजे काहीतरी हेतू त्यामागे असेल. त्या कालखंडातील जो कोणी आदेश देणारा असेल, त्याचा हेतू काही शुध्द असेल असं नाही. परवानगीविना फोन टॅप करणे, म्हणजे व्यक्तीगत स्वातंत्र्यावर हल्ला करण्यासारखे आहे. मला तो घटनात्मक अधिकार आहे की माझ्या परवानगीशिवाय असं करता येऊ नये. परवानगीशिवाय ६८ दिवस माझा फोन टॅप केला गेला. आता माझी परवानगी अशी आहे की, त्या कालखंडामध्ये याची मला पूर्वकल्पना न देता किंवा माझ्याशी चर्चा न करता माझा जबाब न घेता, या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर केला गेला. एक दिवस बोलावलं एक मिनीटाचा जबाब घेतला आणि सोडून दिले.’

त्याचबरोबर माझी विनंती आहे की, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. ज्यांचे फोन टॅप केले गेले मग संजय राऊतांचा (Sanjay Raut) केला, माझा केला, नाना पटोलेंचा (Nana Patole) केला.
तर यांना समक्ष बोलावून त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करून त्यांचा तरी जबाब घेतला पाहिजे.
हे प्रकरण गंभीर असून आजही मला भीती वाटते, कोणाशी बोलायचं, कसं बोलायचं.
जर फोन अशा पध्दतीने टॅप होत असतील तर हे बरोबर नाही. असही या प्रकरणावर बोलताना खडसे म्हणाले.

तसेच एकनाथ खडसेंनी याबाबत काही सवाल देखील उपस्थित केले आहेत.
ते म्हणाले, आता जर प्रथमदर्शनी असं दिसलं असेल तर त्या अधिकाऱ्यावर तुम्ही यासंबंधी काय कारवाई करणार
आहात? यामागे कोण आहे, कोणाला फायदा होणार होता? काय संभाषण झालं.
माझ आणि ते संभाषण प्रकाशित करणार आहात का? जर माझं काही खासगी संभाषण असेल,
तर त्याचा काही दुरूपयोगही होऊ शकतो. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मला मिळायला पाहिजेत.
हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, मी या सभागृहाचा एक सदस्य आहे आणि माझाच जर फोन टॅप होत असेल,
तर मुख्यमंत्री महोदय मला या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. न्यायालयाची चौकशी होईल तेव्हा होईल.
प्रथमदर्शनी तथ्य असेल, तर त्या अधिकाऱ्यांविरोधात आपण तातडीने काय कारवाई करणार असा सवाल
देखील एकनाथ खडसेंनी यावेळी उपस्थित केला. तसेच नियमानुसार नाही, घटनाबाह्य आहे म्हणून तातडीने
या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा अशी मागणी देखील खडसेंनी विधानपरिषदेत बोलताना केली.

Web Title :-  Phone Tapping Case | phone tapping case my phone was tapped for 68 days eknath khadse statement in legislative council

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | अजित पवार मोबाईल बंद ठेवून ८-८ दिवस गायब होतात; अजित पवारांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचे पलटवार…

Devendra Fadnavis | ‘हा पहिलाच विरोधी पक्ष आहे, जो स्वत:च्या काळातले घोटाळे बाहेर काढत आहे’, देवेंद्र फडणवीस यांचा खोचक टोला (व्हिडिओ)