Devendra Fadnavis | ‘हा पहिलाच विरोधी पक्ष आहे, जो स्वत:च्या काळातले घोटाळे बाहेर काढत आहे’, देवेंद्र फडणवीस यांचा खोचक टोला (व्हिडिओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे-फडणवीस सरकारमधील (Shinde-Fadnavis Government) मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी टीईटी घोटाळ्याचे (TET Scam) आरोप केले आहेत. सत्तार यांच्या विरोधात सोमवारी अजित पवार (Ajit Pawar) आक्रमक झाल्याचे दिसून आले होते. आता आज पुन्हा अब्दुल सत्तार यांना टीईटी घोटाळ्यावरुन लक्ष्य करण्यात आले. टीईटी घोटाळ्याच्या आरोपांवर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांना खोचक टोला लगावला. टीईटी घोटाळा कोणाच्या काळात झाला? भारताच्या इतिहासातील हा पहिलाच विरोधी पक्ष आहे, जो स्वतःच्या काळातील प्रकरणे, घोटाळे बाहेर काढत आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला.

टीईटी घोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालयात

राज्यातल्या लाखो तरुणांना बुडवणारा टीईटी घोटाळा महाविकास आघाडीच्या काळात झाला. या ठिकाणी सनदी अधिकाऱ्यांपासून सगळे लोक त्या टीईटी घोटाळ्यात लिप्प होते. त्यांच्या काळात झालेल्या टीईटी घोटाळ्याचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत (Mumbai Mantralaya) गेले. मंत्रालयातले अधिकारी या घोटाळ्यात अटक (Arrest) झाले. आता या घोटाळ्यावरुन मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप केले जात आहेत. सत्तार यांच्यावर जे आरोप करण्यात आले त्यात मी सांगेन त्यांच्या कुठल्याही मुलीला टीईटीच्या अंतर्गत नोकरी लागलेली नाही, असा खुलासा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहात केला.

असल्या गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही

विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले, एक नवी पद्धत सुरु झाली आहे की कोणत्याही मंत्र्यावर बेछूट आरोप करायचे अन् निघून जायचे. दिवसभर मीडियात तेच चालवत राहायचं. पण या असल्या गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही. त्या आरोपांना आम्ही तसंच उत्तर देऊ असं फडणवीस म्हणाले.

लवंगी फटाकाही सापडला नाही

खरं म्हणजे मला आश्चर्य वाटतं की हा पहिला विरोधी पक्ष असेल जो सत्ताकाळातल्या गोष्टी भ्रष्टाचार (Corruption) म्हणून बाहेर आणतो आहे. वरुन आदेश आहे मला माहित आहे की बॉम्ब बॉम्ब म्हणत होते पण लवंगी फटाकाही सापडला नाही. सभात्याग करणाऱ्यांनी मला उत्तर द्यावं की टीईटी घोटाळा कसा झाला? लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न चुरडण्याचं काम कुणी केलं? अपात्र कंपन्यांना पात्र करण्याचं काम कुणी केलं? असे प्रश्न उपस्थित करत फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हाल्लाबोल केला.

मात्र, आम्ही सोडणार नाही

टीईटी घोटाळ्यावरुन अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप करण्यात येत आहे.
परंतु त्यांची कोणतीही मुलगी टीईटी अंतर्गत नोकरीला लागली नाही. टीईटी आयुक्तांनी तसा खुलासा केला आहे.
पण, कोणत्याही मंत्र्यावर बेछूट आरोप करुन निघून जायचं.
मात्र, आम्ही सोडणार नाही, तसेच उत्तर देऊ असा इशारा फडणवीस यांनी विरोधकांना दिला.

Web Title :-  Devendra Fadnavis | dcm devedra fadnavis to mva and mocks them in winter session against alligations abdul sattar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | अजित पवार मोबाईल बंद ठेवून ८-८ दिवस गायब होतात; अजित पवारांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचे पलटवार…

Beed ACB Trap | अनुदानाच्या चेकवर सरपंच आईची सही घेऊन देण्यासाठी 20 हजार रुपये लाचेची मागणी, मुलावार एसीबीकडून FIR