फायद्याची गोष्ट ! पेट्रोल भरल्यानंतर मिळेल 150 रुपयांचा कॅशबॅक, ‘या’ पध्दतीनं पेमेंट करून घ्या ‘लाभ’

नवी दिल्ली : देशभरात पेट्रोलच्या वाढत्या किंमतीने सर्व लोक त्रस्त आहेत, परंतु आता तुमच्यासाठी खुशखबर आहे. आता पेट्रोल भरल्यानंतर तुम्हाला कॅशबॅकची सुविधा मिळेल. PhonePe आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर घेऊन आले आहे. ज्यामध्ये पेट्रोल भरल्यानंतर कॅशबॅक मिळेल. इंडियन ऑईल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत गॅस आपल्या ग्राहकांसाठी ही खास ऑफर घेऊन आले आहेत. किती रुपयांचा कॅशबॅक तुम्हाला मिळू शकतो ते जाणून घेवूयात…

यामध्ये तुम्हाला 0.75 टक्के कॅशबॅक दिला जाईल. ग्राहकांना एका ट्रांजक्शनवर कमाल 45 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो. तर, एका महिन्यात कमाल 150 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. या ऑफरचा फायदा तुम्ही 1 जानेवारी 2021 पासून 30 जून 2021 पर्यंत घेऊ शकता.

फोन पे वरून कसे कराल पेट्रोल पंपावर पेमेंट
तुम्ही इंडियन ऑईल किंवा हिंदूस्तान पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर लावलेला क्विक रिस्पॉन्स (क्यूआर) कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता. जिथे स्कॅन करण्याची सुविधा नाही, तिथे पेट्रोल पंपाकडून अ‍ॅपवर ठराविक रक्कमेची पेमेंट रिक्वेस्ट येईल, जी तुम्ही अ‍ॅप्रूव्ह करून पेमेंट करू शकता.

24 तासात येईल कॅशबॅक
ग्राहकांच्या खात्यात कॅशबॅक फोन पे गिफ्ट व्हाऊचर बॅलन्सच्या रूपात मिळेल. तो 24 तासांच्या आत तुमच्या अकाऊंटवर पाठवला जाईल. याचा वापर रिचार्ज किंवा बिल भरण्यासाठी करू शकता. फोनपे वॉलेटमध्ये जमा पैसे, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा या अ‍ॅपवरून लिंक यूपीआय अकाऊंटवरून पेमेंट करू शकता.