PhonePe | ‘फोनपे’वर खरेदी करता येईल इन्श्युरन्स पॉलिसी, 30 कोटी लोकांना होईल फायदा; जाणून घ्या

नवी दिल्ली : डिजिटल पेमेंट प्लेटफॉर्म PhonePe ने माहिती दिली आहे की, त्यांना लाईफ आणि जनरल इन्श्युरन्स (life and general insurance) प्रॉडक्ट विकण्यासाठी इरडा (IRDAI) कडून तत्वतः मंजूरी मिळाली आहे. ज्याचा फायदा देशातील सुमारे 30 कोटी PhonePe यूजर्सला होईल. फोनपेला भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) कडून इन्श्युरन्स ब्रोकिंग लायसन्स जारी करण्यात आले आहे.

मागील वर्षी PhonePay ने मर्यादित विमा कॉर्पोरेट एजंट लायसन्ससह विमा क्षेत्रात (insurance sector) प्रवेश केला होता. यात कंपनीला प्रत्येक कॅटेगरीसाठी केवळ तीन विमा कंपन्यांसोबत भागीदारीसह मर्यादित केले होते. आता, नवीन डायरेक्ट ब्रोकिंग लायसन्ससह, फोनपे भारतात सर्व इन्श्युरन्स कंपन्यांचे इन्श्युरन्स प्रॉडक्ट वितरित करू शकते.

कंपनीने म्हटले की, नवीन ब्रोकिंग लायसन्स फोनपेला आपल्या 30 कोटीपेक्षा जास्त यूजर्ससाठी व्यक्तिगत उत्पादनांची शिफारसी सादर करणे आणि भारतीय ग्राहकांसाठी विमा उत्पादनांचे जास्तीतजास्त पोर्टफोलियो सादर करण्याची परवानगी देते.

PhonePe चे उपाध्यक्ष आणि विमा प्रमुख गुंजन घई (Vice President and Head of
Insurance Gunjan Ghai) यांनी म्हटले की, हे लायसन्स आमच्या विमा प्रवासातील मैलाचा
दगड आहे. फोनपे भारतातील सर्वात वेगाने वाढणारी इन्श्योरटेक आहे आणि ब्रोकिंगच्या या
पावलाने आम्हाला आणखी गती मिळेल. कंपनी हाय क्वालिटी इन्श्युरन्ससह पार्टनरशीन करून
नवीन प्रॉडक्टच्या माध्यमातून आपल्या कस्टमर्ससाठी एक मजबूत प्लॅटफॉर्मची निर्मिती करत आहे.

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात 2 महिलांची भांडणे पाहणे सुरक्षा रक्षकाला पडले ‘महागात’, जाणून घ्या प्रकरण

Pre Mature Child Study | आईचा आवाज ऐकून ‘प्री मॅच्युअर’ बाळाच्या वेदना होतात कमी – संशोधन

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  PhonePe | insurance policies can be bought on phonepe 30 crore people will benefit

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update