home page top 1

#Photo: तापसी पन्नूने शेअर केले ‘ते’ फोटो, पाहून तुम्ही देखील व्हाल थक्‍क

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूचे काही फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. यातील एका फोटोत दिसत आहे की, तापसीचा एक हात पूर्णपणे जखमी झाला आहे. तर दुसऱ्या फोटोत दिसत आहे की, दोन्ही पायाला प्लास्टर केलं आहे. तापसीने स्वत: हे फोटो सोशलवर शेअर केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तापसी म्हणते की, “हो, हो बर्फाने आच्छादित पर्वतावर शिफॉन साडी नेसून 25 दिवस काम करणं खूपच अवघड गोष्ट आहे. म्हणूनच मी हे निवडलं.”

तापसीने लिहिलेले कॅप्शन आणि फोटो पाहता लक्षात येते की ती जखमी झाली आहे. दरम्यान सत्य काय आहे हे मात्र तिने स्पष्ट केले नाही. या फोटोंमुळे सर्वजण तापसीला खुशाली विचारताना दिसत आहेत. परंतु अद्याप हे समोर आलेले नाही की, हे प्रोस्थेटिक्स आहे की मेकअप. तुम्हाला सांगू इच्छितो की, हे फोटो तापसीच्या गेमओव्हर या सिनेमाच्या सेटवरील आहे. या सिनेमात तापसी व्हिडीओ गेम प्रोग्रामरच्या रोलमध्ये दिसणार आहे. स्वप्ना असं तिच्या भूमिकेचे नाव आहे. तिच्या घरात काही लोक शिरकाव करतात आणि मग तापसी घायाळ होऊन व्हील चेअरवर येते.

तापसी एका मुलाखतीत म्हणाली होती की, “या सिनेमासाठी मला 25 दिवस व्हिल चेअरवर रहावं लागलं होतं. अश्विन सरवनन यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. गेमओव्हर हा सिनेमा 14 जून रोजी रिलीज होणार आहे. ही सिनेमा तामिळ, तेलुगू आणि हिंदी अशा तिनही भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

शाळांमध्ये लागणार तंबाखूविरोधी फलक

महाराष्ट्रात ‘निपाह’चा धोका नाही ; मात्र खबरदारी घ्या

बोगस पॅथॉलॉजी लॅबकडे महापालिकांचे दुर्लक्ष

गर्भपाताची औषधे विकणाऱ्या ऑनलाईन पोर्टलविरोधात एफआरआय

 

Loading...
You might also like