‘रांझणा’, ‘रॉकस्टार’सह ‘हे’ 7 सिनेमे नाकारणं शाहिद कपूरची ‘घोडचूक’, कधीच झाला असता ‘सुपरस्टार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार शाहिद कपूरनं कबीर सिंह सिनेमातून सिद्ध केलं की, तो फक्त क्लास नाही तर मास हिरो आहे. शाहिदला आपल्या या सक्सेससाठी खूप पापड बेलावे लागले आहेत. बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमे दिल्यानंतरही शाहिद तिथे पोहोचला नव्हता जिथे तो पोहोचायला हवा होता. याच एक मोठं कारण त्यानं घेतलेले निर्णय आहेत. इश्क विश्क सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणाऱ्या शाहिदनं असे अनेक सिनेमे रिजेक्ट केले आहेत ज्यामुळं तो कधीच सुपरस्टार झाला असता. सिनेमांची यादी पाहिल्यानंतर तुम्हालाही असं वाटेल की, शाहिदनं असं का केलं असेल.

1) रंग दे बसंती – आमिर खान स्टारर हा सिनेमा सोडणं शाहिदची सर्वात मोठी चूक होती. त्याचा तसा तर लिड रोल नव्हता. परंतु शाहिदनं हा सिनेमा नाकारला होता. हा सिनेमा नाकारल्याचं त्याला दु:ख आहे. त्यानं एका मुलाखतीत तसं सांगितलंही होतं.

2) रॉकस्टार – रणबीर कपूरला रातोरात स्टार करणाऱ्या या सिनेमासाठी आधी शाहिद कपूरला ऑफर देण्यात आली होती. परंतु शाहिदनं इम्तियाज अलीचा जब वी मेट हा सिनेमा निवडला होता.

https://www.instagram.com/p/BnoryUlnKzF/

3) रांझणा – साऊथ सुपरस्टार धनुष यानं या सिनेमातूनच बॉलिवूड डेब्यू केला होता. आधी हा सिनेमा शाहिदला ऑफर झाला होता. शाहिदनं हा सिनेमा रिजेक्ट केला.

4) बँग-बँग- हृतिक रोशनच्या आधी हा सिनेमा शाहिदच्या वाट्याला आला होता. परंतु नंतर या सिनेमात हृतिकची एन्ट्री झाली होती.

5) वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा – अक्षय कुमार स्टारर या सिनेमात इम्रान खानच्या रोलसाठी आधी शाहिद कपूरला निवडण्यात आलं होतं. परंतु त्यानं इम्रान खानला संधी दिली.

6) शुद्ध देसी रोमँस – परिणिती चोपडा आणि सुशांत सिंह राजपूत या सिनेमासाठी आधी शाहिदला निवडलं होतं. परंतु शाहिदनं या सिनेमासाठी नकार दिला होता.

7) राजनीती – प्रकाश झा दिग्दर्शित या सिनेमातील रणबीर कपूरच्या भूमिकेसाठी शाहिदला अप्रोच करण्यात आलं होतं. परंतु या सिनेमातील दिग्गज कलाकारांचा त्याच्या उपस्थितीवर परिणाम होईल आणि त्याला हे ऑनस्क्रीन महागात पडेल असं त्याला वाटलं. शाहिदची ही चूक करिअरसाठी नुकसानदायक ठरली.

https://www.instagram.com/p/B80g6GDDsJL/