फुलराणी लवकरच अडकणार विवाहबंधनात 

हैदराबाद : वृत्तसंस्था

भारताची फुलराणी सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप या वर्षाखेरीस विवाहबंधनात अडकणार आहेत. येत्या १६ डिसेंबरला सायना आणि पी.कश्यप लग्न करणार असून लग्नानंतर पाच दिवसांनी रिसेप्शन सोहळा असेल. ऑलिम्पिकमधील कांस्यपदकविजेती सायना आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक पारुपल्ली कश्यप यांच्यातील नात्याची खूप दिवसांपासून चर्चा होती. प्रशिक्षक गोपीचंद यांचे दोघेही शिष्य. त्यामुळे त्यांच्यामध्ये खूप वर्षांपासून मैत्री आहे. या नात्याचे रुपांतर आता विवाहबंधनात होत आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’36f903b0-c155-11e8-a95a-3b07fed0955d’]

काही दिवसांपूर्वी सायानानं पी. कश्यपसोबत शेअर केलेला एक फोटो चर्चेचा विषय ठरला होता. तेव्हापासूनचं या दोघांच्या नात्याबद्दल चाहत्यांनी अनेक तर्क लढवण्यास सुरुवात केली होती. या दोघांनी देखील आपलं नातं कधी लपवलं नाही मात्र, कधीही आपल्या नात्याला अधिकृतरित्या दुजोरा देखील दिला नव्हता. २८ वर्षीय बॅडमिंटन स्टार सायना जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर आहे. तर ३२ वर्षीय पी. कश्यप जागतिक क्रमवारीत ५७  क्रमांकावर आहे.

राफेलची किंमत जाहीर करण्याची शरद पवारांची मागणी