पायलिंग टेस्ट फेल झाल्यानंतर चंपत राय म्हणाले – ‘राम मंदिराची गॅरंटी 1000 वर्षांची नाही, केवळ इतकीच असेल’

अयोध्या : श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी आज म्हटले की, तयार होत असलेल्या राम मंदिराची हजार वर्षांची गॅरंटी कुणीही देऊ शकत नाही. मंदिराच्या एक हजार वर्षांच्या आयुष्याला केवळ कल्पनाच म्हणता येईल. तीनशे ते चारशे वर्षांची गॅरंटी मिळाली तरी आम्ही बांधकामासाठी सहमत आहोत.

चंपत राय राम मंदिर बांधकामाच्या प्रगतीची माहिती संतांना देत होते. त्यांनी म्हटले की, मंदिरासाठी करण्यात आलेले पायलिंग टेस्टिंग फेल झाले. काँक्रिटचे खांब 700 टनचा लोड घेताच ढासळले. मंदिराचे आयुष्य वाढवण्यासाठी सिमेंटमध्ये अभ्रक, कोळशासह काही इतर केमिकल मिसळण्यावर विचार सुरू आहे.

त्यांनी म्हटले की, देशभरातील तज्ज्ञांनी राममंदिरासाठी हजार वर्षांची लेखी गॅरंटी देण्यात हात वर केले आहेत. मंदिरासाठी तयार केलेली टेस्ट पायलिंग अगोदरच फेल झाली आहे. टेस्ट पिलरवर लोड टाकल्यानंतर भूकंपासारखे झटके देण्यात आले आणि त्यामध्ये भेगा पडून ते कोसळले. हे पाहता ट्रस्टने नव्याने तंत्रज्ञान तज्ज्ञांसोबत चर्चा सुरू केली आहे.

मंदिर बांधकामाची जबाबदारी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने लार्सन अँड टूब्रो तसेच टाटा कन्सल्टन्सीला दिली आहे. त्याच्या मजबूतीसाठी तज्ज्ञांची आठ सदस्यांची टीम सुद्धा बनवण्यात आली आहे. परंतु, कुणीही एक हजार वर्ष टिकणार्‍या मंदिराची गॅरंटी देण्यास तयार नाही.

त्यांनी म्हटले की, डिझाईननुसार मंदिराचे 32 जिने चढल्यानंतर रामललाचे दर्शन होईल. या कामात 16 हजार घन फुट दगड लागतील. यासाठी साडेसोळा फुट ऊंच प्लॅटफॉर्म बनवण्यात येईल. तो दोन फुट लांब, दोन फुट रूंद, आणि दोन फुट उंच असेल. प्लॅटफॉर्ममध्ये सुद्धा दगडांचा वापर होईल. ज्या खाणीतून हा दगड येणार आहे तिची निवड करण्यात आली आहे.

चंपत राय यांनी सांगितले की, राममंदिराच्या बांधकामासाठी आगामी 14 जोनवारी मकर संक्रांतीपासून 27 फेब्रुवारीपर्यंत चालणार्‍या जनसंपर्क अभियानाबबात अयोध्येत सुद्धा संमेलनाचे आयोजन विहिंप मुख्यालय कारसेवकपुरममध्ये झाले. त्यांनी स्पष्ट केले की, अयोध्यामध्ये सर्वांचे आराध्य श्रीरामांचे घर तयार होत आहे. त्यांच्या घराच्या निर्मितीसाठी आम्ही दान नव्हे, तर एैच्छिक समर्पण मागत आहोत. हे धनसंग्रह नाही तर निधी संग्रह अभियान असेल. ज्या अंतर्गत देशातील अर्ध्या लोकसंख्येशी संपर्क साधला जाईल.

तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या महासचिवांनी म्हटले की, अभियानाबाबत देशातील 40 शहरात बैठका होतील. देवाचे घर तोडण्यात आले होते, आता पुन्हा तयार होत आहे, स्वेच्छेने समाजाने समर्पण करावे. आमच्याकडे चार मार्ग आहेत. पहिला मार्ग आम्ही मोठमोठे उद्योगपती टाटा, बिर्ला, अंबानी यांच्याकडे जाणे, दूसरा जगातील लोकांकडून पैसा मागवणे, तिसरा मार्ग मोठ-मोठ्या कंपन्यांचे सहकार्य घेणे आणि चौथा मार्ग जनतेकडे जाणे. आम्ही चौथा मार्ग निवडला आहे. यानंतरही जर काही अडचण असेल तर इतर मार्ग अवलंबले जातील. टाटा, बिर्ला, अंबानी सुद्धा जनतेचाच भाग आहेत.