मद्यपान करून ‘ते’ 2 पायलट झाले ‘टूल’, ‘गोत्यात’ आल्याने खाणार 2 वर्ष जेलची ‘हवा’ !

स्टॉकलँड : वृत्तसंस्था – एका आंतरराष्ट्रीय विमान फ्लाइट उडवण्यापूर्वीच दोन पायलटला नशेत पकडण्यात आले आहे. त्यानंतर त्यांची फ्लाईट रद्द करण्यात आली. तसंच दोन्ही पायलटला अटक करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना स्कॉटलँड येथील ग्लासगो एअरपोर्टवर घडली आहे.

शनिवारी युनायटेड एअरलाइन्सची फ्लाइट ग्लासगोवरून न्यू जर्सीला जाणार होती. मात्र फ्लाइट निघण्यापूर्वी पायलटची अल्कोहल टेस्ट करण्यात आली. यात दोघेही फेल झाले. त्यामुळे एअरलाईन्सकडे अधिकचे पायलट उपस्थित नसल्याने त्यांनी ती फ्लाइट कॅन्सल केली.

ताब्यात घेतलेल्या दोन्ही पायलेटचे वय ६१ वर्ष आणि ४५ वर्षे आहे. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येईल. तसंच त्यांना आरोपी सांगितल्यानंतर त्यांना दोन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. तसच या घटनेमुळे प्रवाशांना विनाकारण थांबवण्यात आले होते. त्यामुळे या घटनेवरून सध्या सोशल मीडियामध्ये राग व्यक्त होत आहे.

दरम्यान, स्कॉटलँड पोलीसांनी हे दोन्ही पायलट आमच्या ताब्यात असल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली. त्यानंतर आता मात्र स्कॉटलँडच्या पायलट वर्गाला १०० मिली मध्ये ९ मिलीग्रॅम अल्कोहलची मर्यादा ठेवण्यात आली आहे. तर रस्त्यांवरील गाड्यांच्या ड्राईव्हर्ससाठी ही मर्यादा २२ मिली ग्रॅम ठेवण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त