Lohegaon Pune Crime | पुणे : प्रेसंबंधाच्या संशयावरुन मारहाण, चारचाकी गाडीची तोडफोड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Lohegaon Pune Crime | मैत्रिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून चार जणांच्या टोळक्याने एका युवकाला हॉकी स्टीकने व कटर सारख्या हत्याराने मारहाण केली. तसेच युवकाच्या चारचाकी गाडीच्या काचांची तोडफोड करुन नुकसान केले. हा प्रकार लोहगाव परिसरातील धानोरी जकात नाका (Dhanori Jakat Naka) येथील पोरवाल रोडवर (Porwal Road) रविवारी (दि.14) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी अनुज जगतनारायण पांडे (वय-35 रा. पिंक सिटी सोसायटी, साठे वस्ती, लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police) फिर्याद दिली आहे. यावरुन सुरजीत सुरेश जगताप (वय-33 रा. हडपसर) व त्याच्या इतर तीन साथीदारांवर आयपीसी 326, 507, 427, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनुज आणि आरोपी सुरजीत याच्या मैत्रिणीमध्ये प्रेमसंबंध (Love Affair)
असल्याचा संशय सुरजीतला होता. याच कारणावरून आरोपी सुरजीतने अनुजला फोन करुन धमकी दिली.
तसेच पोरवाल रोडवरील विनायक मेडिकल जवळ बोलवून घेतले. आरोपींनी हॉकी स्टीक सारख्या लाकडी दांडक्याने व कटरने मारहाण करुन जखमी केले. तसेच अनुज पांडे याच्या हुन्डाई क्रेटा कारची समोरील व पाठीमागील तसेच दरवाजाच्या काचा फोडून नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी.बी. वाकडे (PSI BB Wakde) करीत आहेत.

तरुणाला लोखंडी पाईपने मारहाण

पुणे : दुकानातील भंगार का विकली नाही याबाबतचा राग मनात धरुन दोघांनी एका भंगार व्यावसायिकाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले.
हा प्रकार आव्हाळवाडी (Awhalwadi) येथे भंगाराच्या दुकानासमोर शनिवारी (दि.13) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.
याप्रकरणी मोहम्मद अक्रम अब्दुलकलाम मणिहार (वय-23 रा. आव्हाळवाडी) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात
(Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन मुस्तकिम शेख (वय-20), असलम शेख
(वय-30 दोघे रा. आव्हाळवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींनी फिर्यादी यांना तुझ्या दुकानातील भंगार का विकले नाही याचा राग मनात धरुन शिवीगाळ करुन डोक्यात लोखंडी
पाईपने मारहाण केली.
तसेच असलम याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन तू जर माझ्या विरुद्ध तक्रार केली तर तुला व तुझ्या भावाला मारुन
टाकण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Satara Lok Sabha Election 2024 | साताऱ्यातून अखरे उदयनराजे भोसलेंना भाजपाची उमेदवारी; भोसले विरूद्ध शिंदे सामना रंगणार

Vadgaon Sheri Pune News | पुणे : बागेत खेळणाऱ्या लहान मुलांसोबत अश्लील कृत्य, नारधमास अटक

Baramati Lok Sabha Election 2024 | बारामतीसाठी अजित पवारांनीही घेतला उमेदवार अर्ज, हा प्लॅन ‘बी’ आहे की ‘ए’, राजकीय वर्तुळात चर्चा