Bridegroom Suicide In Talegaon Dabhade | पिंपरी : खळबळजनक! लग्नादिवशीच नवरदेवाने उचललं टोकाचं पाऊल, लग्नमंडपात शोककळा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Bridegroom Suicide In Talegaon Dabhade | ऐन लग्नाच्या दिवशीच नवरदेवानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तळेगाव दाभाडे मध्ये घडलीय. सूरज राजेंद्र रायकर (वय-28 रा. माळीनगर, तळेगाव) असे आत्महत्या केलेल्या नवरदेवाचे नाव आहे. मुहूर्ताच्या तोंडावरती विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज याचे आज लग्न होते. घरात सगळीकडे लग्नाची धामधूम सुरू होती. दरम्यान सकाळी सूरजने मामाला फोन केला. मला लग्न करायचे नाही, असे सांगून तो घरातून बाहेर गेला. घरातल्या मंडळींनी सर्वत्र त्याचा शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. काही वेळानंतर घरापासून काही अंतरावर वाण्याचा मळा येथील विहिरीजवळ सुरज याची दुचाकी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांना शंका आल्याने पोलिसांच्या पथकाने वाण्याचा मळा येथे धाव घेतली.
पोलिसांनी काही स्वयंसेवकांच्या मदतीने विहिरीत शोध घेतला. त्यावेळी सूरज याचा मृतदेह मिळून आला.
या घटनेमुळे तळेगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लग्नात आलेल्या सर्व पाहुण्यांना ही घटना ऐकून धक्का बसला.
मुलाने लग्नाच्या काही मिनिटांपूर्वीच आत्महत्या का केली, असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Satara Lok Sabha Election 2024 | साताऱ्यातून अखरे उदयनराजे भोसलेंना भाजपाची उमेदवारी; भोसले विरूद्ध शिंदे सामना रंगणार

Vadgaon Sheri Pune News | पुणे : बागेत खेळणाऱ्या लहान मुलांसोबत अश्लील कृत्य, नारधमास अटक

Baramati Lok Sabha Election 2024 | बारामतीसाठी अजित पवारांनीही घेतला उमेदवार अर्ज, हा प्लॅन ‘बी’ आहे की ‘ए’, राजकीय वर्तुळात चर्चा