Pimpri Cheating Fraud Case | पिंपरी : एमटीडीसीचे बुकिंग कॅन्सल करणं पडलं महागात, निवृत्त नेव्ही ऑफिसरला साडेसात लाखांचा गंडा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Cheating Fraud Case | MTDC (महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) वरुन बुकींग कॅन्सल करणे एका निवृत्त नेव्ही ऑफिसरला चांगलेच महागात पडले आहे. सायबर चोरट्यांनी ऑनलाईन (Online Cheating Fraud) सात लाख 46 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास बावधन येथील श्री राम कॉलनी येथे घडला आहे. (Pune Cyber Crime)

याबाबत उल्हास पंढरीनाथ गुप्ते (वय-79 रा. माऊंटवर्ट सेलेस्ट, रामनगर कॉलनी, बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन 74393XXXXX मोबाईल धारकावर आयपीसी 420, 406 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांनी एमटीडीसीला संपर्क करुन बुकींग कॅन्सल करण्यासाठी 7439326881
या क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी सायबर चोरट्याने फिर्य़ादी यांना अव्वल डेस्क नावाचे अॅप डाऊनलोड करण्यास
सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी अॅप डाऊनलोड करुन त्यामध्ये बँकेच्या माहितीसह इतर सर्व माहिती भरली. आरोपीने त्यांच्या मोबाईल मधुन सर्व डाटा त्याच्या मोबाईलमध्ये चोरुन घेतला. त्यानंतर फिर्यादी यांचा मोबाईल हॅक करुन त्यांचा बँक खात्यातून सात लाख 46 हजार रुपये ट्रान्सफर करुन घेऊन आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lonikand Crime | पुणे : सासरी येण्यास नकार दिल्याने पत्नीवर वार, पतीला अटक

Pramod Nana Bhangire | ‘अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना निधी न आणणाऱ्या विरोधकांनी श्रेय लाटू नये’ ! ‘विकास कामात अडथळा आणल्यास करारा जवाब मिलेगा’ – प्रमोद नाना भानगिरे

Pune Cheating Fraud Case | बनावट सह्यांच्या आधारे भागीदाराकडून सव्वापाच कोटींची फसवणूक ! न्यायालयाने जामीन फेटाळूनही पोलीस कारवाई करत नसल्याचा पीडित माणिक बिर्ला यांचा पत्रकार परिषदेत आरोप