Pimpri Cheating Fraud Case | पिंपरी : दुकाने व सदनिकांचा ताबा न देता सव्वा तीन कोटींची फसवणूक, दोघांवर गुन्हा दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Cheating Fraud Case | करारनाम्या प्रमाणे दुकाने व सदनिका यांचा ताबा न देता एका 55 वर्षीय नागरिकाची सव्वा तीन कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दिघी पोलिसांनी (Dighi Police) दोन बांधकाम व्यावसायिकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 7 फेब्रुवारी 2016 ते 25 सप्टेंबर 2023 या कालावधीत आकुर्डी येथील जय गणेश व्हिजन व चोविसावाडी येथील फॉर्च्युन हिल टॉप व फॉर्च्युन वेदास बांधकाम प्रकल्पावर घडला आहे.(Pimpri Cheating Fraud Case)

याप्रकरणी हनुमंत माधव दरेकर (वय 55 रा.मांजरी, ता. हवेली) यांनी मंगळवारी (दि.9) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून नितीन शंकर धिमधिमे Nitin Shankar Dhimdhime (वय – 44 ), मकरंद सुधीर पांडे Makrand Sudhir Pandey (वय – 46) यांच्यावर आयपीसी 406, 420, 465, 467, 468, 471, 120(ब) गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.
त्यांना थेरगाव येथील गृहप्रकल्पातील सदनिका व चोविसवाडी येथील नवीन बांधकाम प्रकल्प फॉर्च्युन हिल टॉप
मधील दुकान व तीन सदनिका व फॉर्च्युन वेदास प्रकल्पातील दोन दुकाने व 7 सदनिका खरेदी करण्यासाठी
गुंतवणूक करण्यास सांगितले. फिर्यादी यांनी आरोपींवर विश्वास ठेवून करारनामा करुन तीन कोटी 25 लाख 6 हजार
रुपयांची गुंतवणूक केली. पैसे दिल्यानंतर आरोपींनी करारनाम्याप्रमाणे दुकाने व सदनिकांचा ताबा न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भामरे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Satara Lok Sabha Election 2024 | अखेर साताऱ्याचा उमेदवार ठरला, शरद पवारांनी सोशल मीडियावरून ‘हे’ नाव केले जाहीर

Pimpri Police Raid On Spa Center | पिंपरी : स्पा सेंटरवर छापा! वाकडमध्ये सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, 3 तरुणींची सुटका (Video)

Baramati Lok Sabha Eelction 2024 | बारामतीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी मैदानात?, पंतप्रधानांच्या सभेसाठी नेत्यांचे प्रयत्न, ‘या’ ठिकाणी होऊ शकते प्रचारसभा