Pimpri Cheating Fraud Case | पिंपरी : फसवणूक प्रकरणात तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा पोलिसांच्या जाळ्यात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Cheating Fraud Case | बांधकाम व्यावसायिकाकडे सेल्स मॅनेजर (Sales Manager In Builder Office) म्हणून काम करत असताना ग्राहकांकडून रोख रक्कम घेऊन पसार झालेल्या आरोपीला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या (Pimpri Chinchwad Police) गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या (Pimpri Crime Branch) पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी मागील तीन वर्षापासून राहण्याची जागा बदलुन पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.(Pimpri Cheating Fraud Case)

साइमन रॉनी पीटर Simon Ronnie Peter (वय-40 रा. कात्रज बायपास – Katraj Bypass, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर चिखली पोलीस ठाण्यात आयपीसी 408 नुसार गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्याचा युनिट एकचे पोलीस समांतर तपास करत होते. आरोपी साइमन पीटर हा बांधकाम व्यावसायिकाकडे सेल्स मॅनेजर म्हणून नोकरी करायचा. ग्राहकांकडून रोख स्वरुपात आलेली लाखो रुपयांची रक्कम घेऊन पसार होत होता. आरोपीने मागील तीन वर्षात पिंपरी चिंचवड व पुणे शहर परिसरातील बांधकाम व्यावसायिकांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे. आरोपी राहण्याचे ठिकाण सतत बदलत असल्याने तो पोलिसांना सापडत नव्हता.

पोलीस निरीक्षक गोरख कुंभार (Gorakh Kumbhar PI) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, अजित रुपनवर यांनी आरोपी साइमन पीटर याचा कात्रज बायपास येथे घेतला. पोलिसांनी तांत्रिक तपास करुन पीटरचा ठाव ठिकाणा शोधून काढला. त्यानंतर त्याला कात्रज बायपास येथून ताब्यात घेतले. आरोपी साइमन याच्यावर सन 2022 मध्ये तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात देखील अशा प्रकारचा गुन्हा दाखल आहे. त्याने हिंजवडी (Hinjewadi), हडपसर (Hadapsar), पिरंगुट (Pirangut) या परिसरात अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे समोर आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे (Vinay Kumar Choubey), अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी
(Vasant Pardeshi IPS), पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे (Sandeep Doiphode),
सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) विशाल हिरे (Vishal Hire ACP), सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर
(Balasaheb Kopnar) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार,
श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कानडे (PSI Shivaji Kanade), पोलीस अंमलदार सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे,
बाळु कोकाटे, अमित खानविलकर, गणेश महाडिक, मनोजकुमार कमले, फारुक मुल्ला सचिन मोरे, प्रमोद हिरळकर,
उमाकांत सरवदे, अजित रुपनवर, मारोती जायभाये, स्वप्नील महाले, विशाल भोईर, तानाजी पानसरे,
तांत्रिक विश्लेषक पोलीस अमंलदार नागेश माळी, पोपट हुलगे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Cheating Fraud Case | नोकरी लावण्याच्या बहाण्याने पुण्यात युवकाला 28 लाखांचा गंडा, दाम्पत्यावर FIR

Pune Traffic Police Action On Modified Silencers | ‘बुलेट राजा’वर वाहतूक शाखेची वक्र दृष्टी! 619 बुलेट वर कारवाई, कर्कश आवाजाचे सायलेन्सर जप्त