पिंपरी चिंचवड परिसरात तोडफोडीचे सत्र सुरूच

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी चिंचवडमध्ये तोडफोडीचे सत्र सुरूच आहे . मंगळवार रोजी रात्री उशिरा तोडफोडीच्या दोन घटनेत पाच वाहनांची तोडफोड अज्ञातांनी केली आहे.पहिल्या घटनेत वाकड येथे दोन गटातील पूर्ववैमनस्यातून एकावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला पण तो हाती न लागल्याने दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली, यात अल्पवयीन मुलांचा ही समावेश असून वाकड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.दुसऱ्या घटनेत नेहरूनगर येथे दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी दोन ते तीन दुचाकींची तोडफोड केली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या घटनेचा तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास नेहरुनगर, विट्ठल नगर आणि वाकड येथे काही अज्ञात व्यक्तीनी एकूण १२ गाडयांची तोडफोड केली. याशिवाय रस्त्यावर थांबलेल्या टेम्पो ,दुचाकी वाहनांसहित इतर वाहनांचे देखील नुकसान केले. हे करून देखील ते शांत बसले नाहीत तर त्यांनी गणेश रामदास नेरकर, संभाजी म्हस्के यांच्यासह आणखी काही व्यक्तीना जखमी केले. पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या काही महिण्यापासून अल्पवयीन मुलांकडून मोटारीची तोडफोड करून दहशत पसरवण्याचे काम सुरू आहे.परंतु अल्पवयीन असल्याने पोलिसांना मोठे पाऊल उचलता येत नाही.तर एप्रिल महिन्यात देखील ४० जणांच्या जमावाने नेहरुनगर येथे वाहनांची तोडफोड करत दहशद पसरवली होती.हातात तलवारी,कोयते,सिमेंट चे गट्टू अश्या प्रकारचे शस्त्र असतात त्यामुळे सामान्य नागरिक त्यांना उडवण्यास मज्जाव करत नाही.मात्र वेळीच या अल्पवयीन आरोपीने मुसक्या आवळल्या नाहीत तर भविष्यात यांच्यातील टोळीचा मोरक्या बनून टोळीचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी पुन्हा टोळी युद्ध सुरू होईल.त्यामुळे पोलिसांसमोर मोठं आवाहन आहे.