दसऱ्याच्या मुहूर्तावर पिंपरी-चिंचवड शहरात जोरदार पाऊस

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा आॅनलाईन – गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पाऊसाने दसऱ्याच्या मुहूर्तावर पिंपरी-चिंचवड शहरात जोरदार हजेरी लावली आहे.गुरुवारी सायंकाळी अचानक ढग दाटून आले आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला.अगोदर हलक्या सरी कोसळल्यानंतर अचानकच विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला.यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’09a9ab02-d2e8-11e8-acc1-8f1a917152b5′]

गेल्या काही दिवसांपासून पाऊसाने दडी मारली होती.आज गुरुवारी दसरा असल्याने सर्वच नागरिक हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत.सायंकाळ पासून कोसळणारा पाऊस पाहून या सणाचा आनंद द्विगुणित झाला आहे.शहराच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला आहे.तर विजांच्या कडकडाट आणि ढगांचा गडगडाट यामुळे लाईट चा लपंडाव सुरू आहे.काही भागात देखील बत्ती गुल झाली आहे.सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून शहरात पाऊस सुरू आहे.ऑक्टोम्बर असल्याने दिवसभर उष्णता वाढली होती मात्र पाऊसाची हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.सायंकाळी पाऊस सुरू झाल्याने अनेक नागरिकांना घराबाहेर पडता आले नाही.आजच्या दिवशी मित्रांना आणि मोठ्या व्यक्तींना भेटायचा दिवस असतो.त्यांना आपट्याची पाने देऊन आशीर्वाद घेतला जातो.मात्र अचानक आलेल्या पाऊसाची सगळ्यांची त्रिधातिरपट उडाली आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8ef1b172-d2e8-11e8-81e1-75926c03fa56′]