Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 1896 रुग्ण ‘कोरोना’मुक्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये (pimpri chinchwad city ) कोरोना  बाधित रुग्णांच्या संख्येचा चढता आलेख आता खाली येताना दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या घटली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शहरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाल्याने पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या तीन हजारांवर आली आहे. सध्या शहरामध्ये 3032 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! आता म्युकरमायकोसिसच्या उपचारांचे दर निश्चित, रुग्णांची लूट थांबणार

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना आकडेवारी
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये (pimpri chinchwad city ) 265 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना (Coronavirus) बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 51 हजार 743 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 1896 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 44 हजार 576 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

IDBI Recruitment 2021 : आयडीबीआय बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, 1 कोटी रूपयांपर्यंतचं पॅकेज; जाणून घ्या प्रक्रिया

ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत घट
शहरामध्ये सध्या 3 हजार 032 ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.तर 27 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये 06 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यूची नोंद झालेल्यामध्ये 17 रुग्ण शहरातील आहेत. तर 10 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4135 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात 56 केंद्रावर लसीकरण
शुक्रवारी (दि.4) शहरामध्ये 56 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण करण्यात आले आहे. आज दिवसभरात 2966 जणांना लस देण्यात आली आहे. यामध्ये 2255 जणांनी पालिकेच्या लसीकरण केंद्रावर तर 711 जणांनी खासगी रुग्णालयात लस घेतली आजपर्यंत शहारमध्ये 5 लाख 04 हजार 097 जणांना लस देण्यात आली आहे.

READ ALSO THIS :

LIC कन्यादान पॉलिसी : जमा करा केवळ 130 रुपये, मुलीच्या लग्नासाठी मिळतील पूर्ण 27 लाख, जाणून घ्या कसे?

दुसर्‍या खुनातून पहिल्या खुनाचा झाला ‘उलघडा’ ! 2 खुन, एक मृत्यु आणि एका आत्महत्येला ठरला ‘तो’ कारणीभूत

भाडेकरूंसाठी खुशखबर ! 2 महिन्यांपेक्षा अधिक जास्तीचं भाडे घेता येणार नाही, नव्या घरभाडे कायद्यामध्ये घरमालक