Coroanaviurs : पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 821 नवे पॉझिटिव्ह तर 23 जणांचा मृत्यू

पिंपरी/ पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णवाढीचा दर गेल्या काही दिवसांपासून वेगाने वाढत असून ही चिंताजनक बाब आहे. शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असले तरी बाधित होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. गेल्या 24 तासामध्ये पिंपरी चिंचवड शहरात 821 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 64 हजार 382 इतकी झाली आहे.

पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज शहरामध्ये 821 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 64 हजार 382 एवढी झाली आहे. आज आढळून आलेल्या 821 रुग्णांमध्ये 760 रुग्ण शहरातील तर 61 रुग्ण शहराबाहेरील आहे. यांच्यासह 1225 रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच शहरातील 395 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच दरम्यान 23 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये 17 रुग्ण शहरातील आहेत तर 6 रुग्ण शहराबाहेरील आहेत. शहरातील मृतांचा आकडा 1353 वर पोहचला आहे. यामध्ये 1056 रुग्ण शहरातील तर 297 रुग्ण शहराबाहेरील आहेत.

शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. आज दिवसभरात 459 रुग्णांची कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 53 हजार 591 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या शहरामध्ये 6429 रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज शहरामध्ये भोसरी, बिजलीनगर, कासारवाडी, जुनी सांगवी, सिंधुनगर, मोरेवस्ती, जाधववाडी चिखली, निगडी प्राधिकरण, मोशी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, पिंपरी, नवी सांगवी, काळेवाडी, आंबेगाव, राजगुरुनगर, कसबा पेठ, शिरवळ, खेड, शिक्रापूर येथील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.