पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्लास्टिक बंदी!

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत प्लास्टिक आणि थर्माकॉलवर बंदी घालण्यात आली आहे.यामुळे गुरुवारी सकाळ पासून अधिकाऱ्यापासून ते कर्मचारी आणि सामान्य नागरिकांपर्यंत सर्वच जणांचे पालिकेच्या मुख्यप्रवेशद्वारावर कसून तपासणी करण्यात येत होती.यावेळी अनेकांच्या जवळील प्लास्टिकच्या पिशव्या काढून घेण्यात आल्या,याला नगरसेवक देखील अपवाद ठरले नाहीत.महानगरपालिकेकडून शहरातील प्रत्येक ठिकाणी प्लास्टिक पिशव्या आणि वस्तूवर नजर ठेवण्यासाठी एक पथक नेमले गेले आहे.जेणेकरून प्लास्टिकवर निर्बंध आणता येईल.

मार्च महिन्यात मंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत प्लास्टिक बंदीची घोषणा केली होती. त्यानंतर टप्या-टप्याने प्लास्टिक वस्तू आणि पिशव्यानवर बंदी आणली आहे.पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत देखील याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.यात अधिकाऱ्यांपासून ते नगरसेवकापर्यंत सगळ्याच समान नियम असल्याचे दिसून आले.महानगर पालिकेच्या या उपक्रमाचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.सकाळ पासून दिडशेच्या वर प्लास्टिक पिशव्या सुरक्षा रक्षकांनी जमा केल्या आहेत.

प्लास्टिक वापरामुळे व विल्हेवाटीमुळे विविध प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या होत्या.प्लास्टिकमध्ये रसायने असल्याने सागरी जीव,वन्य जीव आणि मानवी आरोग्यांवर याचा विपरीत परिणाम होत असल्याचे वारंवार समोर आले आहे.अविघटनशील कचरा उघड्यावर किंवा घनकचरा विल्हेवातीच्या ठिकाणी जाळल्याने नागरिकांच्या आणि प्राण्यांमध्ये विविध आजार निर्माण होत आहेत. प्लास्टिक बंदी कायद्याची काटेकोर पणे पालन करावे लागणार असून याचे उल्लंघन केल्यास दंड किंवा कारावास होण्याची कायद्यात तरतूद आहे.त्यामुळे यापुढे राज्यात प्लास्टिकच्या पिशव्या,ताटं,चमचे आणि टोप्या विकता येणार नसून प्लास्टिक विक्रीप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.