Pimpri Chinchwad Court | पिंपरी चिंचवड न्यायालयासाठी बांधण्यात येणार नवीन इमारत; कोट्यवधी रुपयांची मंजुरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड येथील नवीन न्यायालयाच्या (Pimpri Chinchwad Court) बांधकामाला आता लवकरच प्रारंभ होणार आहे. मोशी- बोऱ्हाडेवाडी येथील पिंपरी-चिंचवड न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे (Public Works Department) 86 कोटी 24 लाख 51 हजार 166 रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. या आधी पिंपरी चिंचवड न्यायालयाचे कामकाज मोरवाडी येथील न्यायालयाच्या इमारतीमध्ये चालत होते. या फौजदारी (Criminal Court) आणि दिवाणी न्यायालयामध्ये (Civil Court) वाढत्या खटल्यांची संख्या आणि वकील, अशिलांना हे न्यायालय अपुरे पडू लागले. कामकाज करताना व्यत्यय येत असल्यामुळे इमारतीचा विस्तार करण्याचा प्रस्ताव करण्यात आला होता. त्यासाठी मोशी- बोऱ्हाडेवाडी येथील प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक 14 मध्ये 16 एकर जागा 2011 मध्ये देण्यात आली होती. मात्र इमारतीचे काम सुरू करण्यास विलंब होत होता. त्यामुळे काही कालावधीसाठी मोरवाडी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय (Pimpri Chinchwad Court) महापालिकेच्या नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम समोरील नव्या इमारतीत स्थलांतरण करण्यात आले. आता मात्र नवीन इमारतीच्या कामाचा शुभांरभ लवकरच होणार असल्याचे समोर आले आहे.

राज्य सरकारकडून (State Govt) मोशीमध्ये तयार केल्या जाणाऱ्या न्याय संकुलासाठी 86 कोटी 24 लाख 51 हजार 166 रुपयांच्या खर्चाला मंजूरी देण्यात आली आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने ऑनलाइन निविदा प्रणालीद्वारे पात्र, सक्षम कंत्राटदार, संस्था, कंपनीकडून निविदा मागवल्या आहेत. येत्या 20 सप्टेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे येथे सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे येथे इच्छुक कंत्राटदारांची निविदापूर्व बैठक देखील पार पडणार आहे. तसेच ई-निविदा 11 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2023 या कालावधी दरम्यान उपलब्ध आहे. निविदा उघडण्याची तारीख 5 ऑक्टोबर 2023 अशी ठरण्यात आली आहे. सर्व निविदा http://www.mahapwd.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

मोशीमध्ये उभारण्यात येणाऱ्या या न्याय संकुलासंदर्भात भोसरीचे आमदार महेश लांडगे (Bhosari MLA Mahesh Landge) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार लांडगे म्हणाले की, “महायुती सरकारच्या काळात निविदा प्रक्रिया करुन इमारतीच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे.
मोशीत चार मजली प्रशस्त इमारतीचे बांधकाम होणार आहे.
पिंपरी-चिंचवडकरांसाठी अद्ययावत न्यायालय आगामी दोन वर्षांत उपलब्ध होईल.
सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रियेचे कामकाज निर्धारित वेळेत पूर्ण करून इमारतीच्या कामाला सुरूवात करावी.
नोव्हेंबर 2023 मध्ये इमारतीच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थित करण्याचे नियोजन आहे.”
अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune VSI Program | अजित पवारांनी शरद पवारांसमोर येणे टाळले; शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीकडे फिरवली पाठ