Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायावर छापा, दोन महिलांची सुटका; एकाला अटक (Video)

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Crime Branch | स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्याव्यवसाय करून (Prostitution Racket) घेणाऱ्या दलालावरती गुन्हे शाखेच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाने (Pimpri Chinchwad AHTU) कारवाई करून स्पा मधून दोन पीडित महिलांची सुटका केली. ही कारवाई सोमवारी (दि. 20) सायंकाळी साडेसात वाजता पिंपळे सौदागर येथे अॅपल ब्युटी सलून अँड स्पा येथे करण्यात आली.(Pimpri Chinchwad Crime Branch)

अक्षय धनराज पाटील Akshay Dhanraj Patil (वय 24, रा. शिवार चौक, पिंपळे सौदागर मूळ रा. जळगाव) असे अटक केलेल्या स्पा मॅनेजरचे नाव आहे. त्याच्यासह स्पा चालक मालक रोहन विलास समुद्रे (वय 35 रा. संत तुकाराम नगर, पिंपरी), भूषण पाटील (वय 30, रा. रहाटणी) यांच्याविरोधात आयपीसी 370(3), 34 सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3,4,5,7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिला पोलीस हवालदार वैष्णवी विजय गावडे (वय-36) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. (Police Raid On Spa Center)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील शिवार चौकातील रेनबो प्लाझाच्या पाचव्या मजल्यावर
असलेल्या अॅपल ब्युटी सलून अँड स्पा येथे बेकायदेशीररित्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक वाहतूक
प्रतिबंधक कक्ष विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा मारला.
यामध्ये पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली. या महिलांकडून आरोपी जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत होते.
वेश्याव्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून आरोपी स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात समोर आले.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे,
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील
पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरिक्षक अनिल डफळ, पोलीस अंमलदार मारुती करचुडे, भगवंता मुठे,
गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, रेश्मा झावरे यांच्या पथकाने केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Porsche Car Accident Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण : अल्पवयीन आरोपीविरोधात महाराष्ट्र परिवहन विभागाचा मोठा निर्णय, ‘या’ वर्षांपर्यंत परवाना बंद

Murlidhar Mohol On Ravindra Dhangekar | पुणे पोर्शे अपघातप्रकरणी रवींद्र धंगेकरांचे फडणवीस आणि पोलिसांवर आरोप; मोहोळांनी दिले प्रत्युत्तर, ”पुणेकर तुम्हाला चांगलंच ओळखतात”

Porsche Car Accident Pune | आरोपी नातवाची कोर्टात गॅरंटी देणाऱ्या आजोबांचे अंडरवर्ल्डशी लागेबांधे, शिंदे गटाच्या नेत्याची धक्कादायक माहिती, संपूर्ण अग्रवाल कुटुंब क्रिमिनल