Porsche Car Accident Pune | आरोपी नातवाची कोर्टात गॅरंटी देणाऱ्या आजोबांचे अंडरवर्ल्डशी लागेबांधे, शिंदे गटाच्या नेत्याची धक्कादायक माहिती, संपूर्ण अग्रवाल कुटुंब क्रिमिनल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Porsche Car Accident Pune | पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे पुण्यातील पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीला काही तासातच जामीन मंजूर झाला. कोर्टात आरोपीच्या आजोबांनी नातवाबाबत हमी दिली की, तो आता वाईट संगत करणार नाही, अभ्यास करेल. तसेच कोर्टाने काही अटी घातल्यानंतर जामीन मंजूर झाला होता. मात्र आता या आजोबांद्दलसुद्धा धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अजय भोसले (Ajay Bhosale Shivsena Leader) यांनी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्रकुमार आग्रवाल (Surendra Agarwal) यांचे अंडरवर्ल्डशी कसे संबंध आहेत (Underworld Connection), आणि भोसले यांच्यावर कसा गोळीबार झाला होता, हे सांगितल्याने खळबळ उडाली आहे. (Vishal Agarwal Family)

कल्याणीनगर परिसरात अल्पवयीन धनिकपुत्राने पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना सध्या देशभरात चर्चेत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला मुलगा हा पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याचा मुलगा आहे (Vishal Agarwal Builder). विशाल अग्रवाल सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे (Vishal Agarwal Arrest). विशाल अग्रवाल याचे वडील सुरेंद्रकुमार आग्रवाल यांचे अडरवर्ल्डशी कसे लागेबांधे आहेत हे अजय भोसले यांनी सांगितले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.(Porsche Car Accident Pune)

शिवसेना शिंदे गटाचे पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अजय भोसले यांनी याबाबत सांगितले की, सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी मला ठार मारण्यासाठी सुपारी दिली होती. त्यासाठी सुरेंद्रकुमार अग्रवाल बँकॉकला जाऊन छोटा राजनला भेटले होते. या सगळ्याचे पुरावे असूनही सुरेशकुमार अग्रवाल यांना अद्याप अटक होऊ शकलेली नाही.

त्यांच्यावर राजकीय वरदहस्त आहे, त्यांचा आर्थिक व्यवहार जोरात असल्याने ते जातील तिकडे कायदा विकत घेतात. संपूर्ण अग्रवाल कुटुंब क्रिमिनल आहे. कुटुंबातील सर्व लोकांवर दोन-दोन गुन्हे दाखल आहेत. आतादेखील अपघात प्रकरणानंतर आपण पैशांच्या जोरावर आपण सगळं काही विकत घेऊ, असे त्यांना वाटते. ती मोठी लोकं आहेत, त्यांना कायदा-सुव्यवस्थेची भीती नाही, भोसले म्हणाले.

अजय भोसले म्हणाले, मी २००९ साली शिवसेनेच्या तिकीटावर आमदारकीच्या निवडणुकीला उभा होतो. त्यावेळी माझे सुरेंद्रकुमार अग्रवाल यांचे बंधू राम अग्रवाल यांच्याशी संबंध होते. तेव्हा सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि राम अग्रवाल यांच्यात १२०० कोटींच्या संपत्तीवरुन वाद सुरु होता. तेव्हा मला धमकीसाठी सतत छोटा राजनचे फोन यायचे.

राम अग्रवाल हे सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना पैसे देत नव्हते. यामध्ये मी राम अग्रवाल यांना पाठिंबा देतो, असे सुरेंद्रकुमार अग्रवाल याने छोटा राजनाला सांगितले. ते मला मारण्याची सुपारी देण्यासाठी बँकॉकला जाऊन छोटा राजनला भेटले होते, अशी माहिती भोसले यांनी दिली.

भोसले म्हणाले, माझा निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असताना पुण्यातील जर्मन बेकरीजवळ छोटा राजनच्या शुटर्सनी माझ्यावर पहिला राऊंड फायर केला. मात्र, त्यांचा नेम चुकला. त्यानंतर आम्ही दोन किलोमीटर पर्यंत गुंडांचा पाठलाग केला.

त्यावेळी त्या गुंडांनी दुसरी गोळी झाडली, ती गाडीच्या काचेला लागून माझ्या मित्राच्या छातीत शिरली. आम्ही त्याला घेऊन रुग्णालयात गेलो. एक वर्षांनी आरोपी पकडले गेले तेव्हा त्यांनी कबुली दिली की, सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी मला मारण्यासाठी छोटा राजनला सुपारी दिली होती, अशी धक्कादायक माहिती भोसले यांनी सांगितली.

अजय भोसले म्हणाले, छोटा राजनला अटक करुन भारतात आणल्यानंतर त्याच्याविरुद्धच्या सगळ्या केसेस सीबीआयकडे वर्ग करण्यात आल्या होत्या. तेव्हा माझ्यावरील गोळीबारप्रकरणात सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना अटक झाली पाहिजे होती. मात्र, अजूनही त्यांना पोलिसांनी अटक केलेली नाही. सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना पैसे देऊन हे प्रकरण रफादफा करायचे आहे, असा आरोप अजय भोसले यांनी केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PCMC Action On Unauthorised Hoardings | पिंपरी : 24 अनधिकृत जाहिरात धारक, जाहिरात फलक धारक आणि जागा मालकांवर गुन्हा दाखल, आतापर्यंत 20 फलकांवर निष्कासनाची कारवाई (Video)

Porsche Car Accident Pune | ‘त्या’ अल्पवयीन मुलाच्या आजोबांचे थेट छोटा राजनशी संबंध?, शिवसेना नेत्याने सांगितला 2009 चा ‘तो’ प्रसंग

Pune Crime News | कायद्याचे रक्षकच बनले भक्षक! भांडण मिटवण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिसांकडून पैशाची मागणी, रेस्टॉरंट चालकाचा व्हिडीओ व्हायरल (Video)