Porsche Car Accident Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण : अल्पवयीन आरोपीविरोधात महाराष्ट्र परिवहन विभागाचा मोठा निर्णय, ‘या’ वर्षांपर्यंत परवाना बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Porsche Car Accident Pune | कल्याणी नगरमध्ये पोर्शे या आलिशान गाडीने दोघांना उडवले (Kalyani Nagar Accident Pune). यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाला त्यावेळी गाडी चालक अल्पवयीन मुलगा मद्यधुंद अवस्थेत होता. या घटनेनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. याप्रकरणी पुण्यातील सत्र न्यायालयात सुनावणी सुरु आहे (Pune Shivaji Nagar Court). तर दुसरीकडे महाराष्ट्र परिवहन विभागानेही या अल्पवयीन आरोपीविरोधात मोठा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात एका वृत्तवाहिनेने वृत्त दिले आहे.(Porsche Car Accident Pune)

वयाच्या साडेसतराव्या वर्षी पोर्शे कार चालवून दोन जणांचा बाळी घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीला आता त्याच्या वयाच्या 25 व्या वर्षांपर्यंत वाहन चालवण्याचा परवाना मिळण्यावर बंदी घातली आहे. महाराष्ट्र परिवहन आयुक्त विवेक भीमनवार (Vivek Bhimanwar IAS) यांनी पीटीआयला याबबत माहिती दिल्याचे वृत्त वृत्तवाहिनीने दिले आहे. मद्याच्या नशेत वाहन चालवल्याप्रकरणी कलम 185 अन्वये नवीन गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर या अल्पवयीन आरोपीला आज बालन्याय मंडळात हजर करण्यात आले.

भीमनवार यांनी मंगळवारी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, कल्याणी नगरमध्ये रविवारी झालेल्या अपघातात सहभागी
असलेल्या लक्झरी वाहनाची तात्पुरती नोंदणी मोटार वाहन (MV) कायद्याच्या तरतुदींनुसार रद्द करण्यात येणार असून पुढील
12 महिन्यांसाठी कोणत्याही प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) नोंदणी करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

भीमनवार यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, पुणे आरटीओला एमव्ही कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल
पोलीस तक्रार नोंदवण्यास सांगितले होते. दरम्यान, परिवहन विभागाच्या आणखी एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की,
पोर्शे कार 12 महिन्यांसाठी जप्त करण्यात येईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PCMC Action On Unauthorised Hoardings | पिंपरी : 24 अनधिकृत जाहिरात धारक, जाहिरात फलक धारक आणि जागा मालकांवर गुन्हा दाखल, आतापर्यंत 20 फलकांवर निष्कासनाची कारवाई (Video)

Porsche Car Accident Pune | ‘त्या’ अल्पवयीन मुलाच्या आजोबांचे थेट छोटा राजनशी संबंध?, शिवसेना नेत्याने सांगितला 2009 चा ‘तो’ प्रसंग

Pune Crime News | कायद्याचे रक्षकच बनले भक्षक! भांडण मिटवण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिसांकडून पैशाची मागणी, रेस्टॉरंट चालकाचा व्हिडीओ व्हायरल (Video)