Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, तीन मुलींची सुटका

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्याव्यवसाय (Prostitution Business) करून घेणाऱ्या दलालांवर पिंपरी चिचंवड गुन्हे शाखेच्या (Pimpri Chinchwad Crime Branch) अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाने कारवाई केली. या कारवाईत पथकाने तीन पीडित महिलांची सुटका केली. याप्रकरणी दोन दलालांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई हिंजवडी येथील गेरा इंम्प्रेसीयम राईज येथील ब्रीथ स्पा अँन्ड मसाज सेंटर (Breathe Spa and Massage Centre) मध्ये केली.

स्पा मॅनेजर पवन बाळासाहेब वनवे (वय 21), स्पा मालक आरोपी दीपक ज्योतीराम कोल्हापूरकर (वय- 40) यांच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) आयपीसी 370(3), 34, सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3, 4, 5, 7 अन्वये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड येथील स्पाच्या नावाखाली काही दलाल स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैद्यरित्या मुलींना स्पाचे नावाखाली जास्त पैशाचे अमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याची माहिती अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाला मिळाली. अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करत असताना ब्रिथ स्पा अँन्ड मसाज सेंटर मध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली. खात्री झाल्यानंतर पथकाने अचानक छापा टाकला.

त्यावेळी आरोपींच्या ताब्यातून तीन मुलींची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे. आरोपींनी पीडित मुलींना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्या स्पा सेंटरमध्ये ठेवले होते. आरोपी त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होते. यातून मिळणाऱ्या पैशातून स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींना ताब्यात घेऊन हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे (CP Vinay Kumar Choubey), अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस अंमलदार सुनील शिरसाट, मारुती करचुडे भगवंता मुठे, गणेश कारोटे, सुधा टोके, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, सोनाली माने यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पिंपरी : दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक