Pimpri Chinchwad News | पिंपरी : दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad News | आकुर्डी भागात दहशत पसरविणाऱ्या सराईत गुन्हेगाराला (Criminal) गुंडा विरोधी पथकाने गजाआड केलं आहे. रात्रीच्या सुमारास रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना विरेंद्र उर्फ बेंद्या भोलेनाथ सोनी Virendra alias Bendya Bholenath Soni (वय-25 रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) नावाचा गुंड त्रास देत होता. याबाबतची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळताच त्याला चांगलाच चोप देऊन बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई आकुर्डी भागातील उर्दू शाळेसमोर शनिवारी (दि.6) रात्री करण्यात आली. बेंद्या हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.

आकुर्डी परिसरातील सराईत गुन्हेगार बेंद्या हा शनिवारी रात्री शर्ट काढून मद्यपान करुन नशेत रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्य नागरिांना त्रास देत होता. त्याने एका रिक्षा चालकाला थांबवून मारहाण केली. रात्रीची वेळ असल्याने नागरिक भीतीच्या सावटाखाली होते. आरोपीने काही तरुणांना मारहाण केली. याबाबत माहिती मिळताच गुंडा विरोधी पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

गुंडा विरोधी पथकाने बेंद्याला चोप देऊन बेड्या ठोकल्या. बेंद्या हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. परिसरात दहशत पसरवण्यासाठी तो नागरिकांना नेहमीच घाबरवत असायचा. त्याने परिसरातील हॉटेल व्यावसायिकांना दमदाटी करुन पैसे उळायचा तसेच पैसे दिले नाहीतर मारहाण करायचा. यापूर्वी देखील निगडी पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यावेळी त्याला समज देऊन सोडून दिले होते. मात्र, शनिवारी पुन्हा त्याने परिसरात दहशत माजवली. अखेर गुंडा विरोधी पथकाने त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : तुमचे आधार कार्ड नवाब मलिक वापरत आहेत, मनीलाँड्रींग प्रकरणात गुन्हा दाखल असल्याची भिती घालून आर्थिक फसवणूक