Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : पथारी व्यावसायिकांकडून वाहतूक पोलिसाला शिवीगाळ, दोघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Crime | पथारी व्यावसायिकांमुळे सर्वजनिक रोडवर वाहतुकीला अडथळा होत असल्याने वाहतूक पोलीस (Pimpri Traffic Police) कर्मचारी त्यांच्यावर कारवाई करत होते. त्यावेळी कर्तव्य बजावीत असलेल्या वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करुन धमकावले. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. हा प्रकार पिंपरीतील झुलेलाल मंदिर चौकातील कपडा मार्केट समोर शुक्रवारी (दि.5) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत पिंपरी वाहतुक विभागाचे शहाजी नारायण पवार (वय-57) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अब्दुल रहीमान जहाउद्दीन इद्रेसी, अनुपमा सिंग उर्फ अमृतकौर गुलजारसिंग वीरदी यांना अटक केली आहे. तर दोन जणांवर 353, 332, 504, 506, 34 सह क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी झुलेलाल मंदिर चौकातील कपडा मार्केट येथील सर्वजनिक रोडवर पथारी लावली होती. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. फिर्य़ादी शहाजी पवार व त्यांचे इतर सहकारी पथारी वाल्यांवर कारवाई करत असताना आरोपींनी सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तसेच त्यांना शिवीगाळ करुन इतर सहकाऱ्यांना धमकावले. आरोपींनी मोठमोठ्याने आरडा ओरडा करून दहशत निर्माण केल्याने परिसरातील दुकानदारांनी त्यांची दुकाने बंद केली. यावेळी फिर्यादी यांच्या मदतीसाठी आलेल्या पोलीस अंमलदार यांना देखील अरेरावी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक कापरे (PI Kapre) करीत आहेत

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पिंपरी : स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, तीन मुलींची सुटका