पिंपरी-चिंचवड मध्ये खड्ड्याने घेतला पहिला बळी

पीएमपी बसखाली सापडल्याने दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

पिंपरी। पोलिसनामा ऑनलाइन

खड्यातून दुचाकी घसरल्याने युवती पीएमपीएमएल बसखाली सापडल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी (६ जुलै) सकाळी साडेनऊच्या सुमारास पिंपरी चिंचवड़ शहरातीलअहिंसा चौकात ही घटना घडली.

तस्मिया मोहसिन देसाई (२९, रा. बाणेर) असे मृत्यू झालोल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. देसाई या शुक्रवारी सकाळी आपल्या चार वर्षाच्या मुलाला पाळणा घरात सोडून परत येत असताना हा अपघात झाला.[amazon_link asins=’B07DJBKBV8′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’aa869acb-8143-11e8-80bd-4769ad788315′]

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, देसाई या अहिंसा चौकात आल्या. सिग्नल सुटल्याने त्या दुचाकीवरून पुढे जात असताना तेथे असलेला खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात त्या रस्त्याववर पडल्या. याचदरम्यान, पीएमपी बस बाजूने जात होती. देसाई या पीएमपी बसच्या मागील चाका चाकाखाली सापडल्या. देसाई यांना तत्काळ पिंपरीमधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

देसाई यांचे सासर साताऱ्याचे असून त्यांचे माहेर पन्हाळा येथील आहे. मात्र नोकरीनिमित्त आपल्या पती व मुलासोबत बाणेर येथे वास्तव्यास होत्या. अपघातानंतर काही वेळातच देसाई यांच्या भावाचा फोन आला होता. यावेळी पोलिसांनी त्याला अपघाताची माहिती दिली. चिंचवड पोलिस तपास करीत आहेत.