Pune Cheating Fraud Case | पुणे : तुमचे आधार कार्ड नवाब मलिक वापरत आहेत, मनीलाँड्रींग प्रकरणात गुन्हा दाखल असल्याची भिती घालून आर्थिक फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मनी लाँड्रींग (Money Laundering) व ड्रग्सच्या गुन्ह्यात तसेच दादऊसोबत संबंध असलेले मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) तुमचे आधार कार्ड (Aadhar Card) वापरत असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी भिती घालून पुण्यातील एका व्यक्तीची 35 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक (Pune Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.3) दुपारी दीड वाजता ऑनलाईन पद्धतीने झाला.

याबाबत अनुप जगनारायण उपाध्याय (वय-51 रा. उत्तमनगर) यांनी शनिवारी (दि.6) उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन राहुल रॉय असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीवर आयपीसी 419, 420, 34 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास फिर्यादी यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन फोन आला. समोरच्या व्यक्तीने राहुल रॉय असे नाव सांगून फेडेक्स एक्सप्रेस कुरीअर मधून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या नावाचे कुरीयर मुंबई एअरपोर्टला संशयास्पद मिळाल्याचे सांगितले. तसेच यामध्ये पाच पासपोर्ट, क्रेडिट कार्ड, लॅपटॉप, 200 ग्रॅम एमडीएमएल अंमली पदार्थ असल्याचे सांगितले. हे पार्सल तैवान येथे पाठवण्यात येणार होते, असेही सांगितले.

आरोपीने फिर्यादी यांना मुंबई क्राईम ब्राँच चे कागदपत्रे पाठवली. त्यामध्ये मनीलाँड्रींग व ड्रग्सच्या गुन्ह्यात तसेच दाऊद सोबत संबंध असणारे मंत्री नवाब मलिक हे तुमच्या आधार कार्डचा वार करत असल्याने गुन्हा दाखल करण्यात आल्याची भिती घातली. आरोपीने फिर्य़ादी यांना बँक खात्यावर आसलेल्या रक्कमेच्या 92 टक्के रक्कम पाठवण्यास सांगितली. त्यानुसार फिर्य़ादी यांनी 35 हजार 649 रुपये आरटीजीएस द्वारे आरोपीने सांगितलेल्या बँक खात्यात जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अनुप उपाध्याय यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्य़ाद दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे कदम करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Nana Peth Crime | पुणे : क्रेनचा हूक डोक्यावर पडून कामगाराचा मृत्यू, 5 जणांवर गुन्हा