Pimpri Chinchwad PCMC News | पिंपरी : अनधिकृतरित्या वृक्षांची छाटणी करणाऱ्यांवर मनपाची कायदेशीर कारवाई

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad PCMC News) कागदपत्रांमध्ये फेरफार व फसणूक करुन वृक्षतोड (Unauthorized Tree Cutting) केल्याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात (Chikhli Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 11 जानेवारी रोजी दुपारी बाराच्या सुमारास आण्णासाहेब मगर बँकेच्या मागे, कुदळवाडी चिखली येथे घडला होता. प्रल्हाद परशूराम पवार (वय-75 रा. संत ज्ञानेश्वर नगर, म्हाडा कॉलनी, मोरवडी, पिंपरी) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत भाऊसाहेब सगरे (वय-54 रा. रमाबाई नगर, पिंपरी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

वृक्षांची छाटणी केल्यास कायदेशीर कारवाई होणार

याबाबत आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, होर्डिंग, जाहिरात फलक धारकांनी आपल्या फलकांसमोरील वृक्षांची छाटणी किंवा तोडणी अनधिकृतरित्या करु नये. महापालिकेच्या परवानगीशिवाय वृक्षतोड केल्यास महाराष्ट्र शासन जाहिरात नियमन व नियंत्रण नियमानुसार जाहिरात फलक धारकाचा परवाना रद्द करुन जाहिरातदाराविरोधामध्येसुध्दा कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून मंगळवारी (दि.१६ जानेवारी) चिखली परिसरामध्ये अनधिकृतरित्या वृक्ष तोडणी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

वृक्षतोड करणाऱ्या 8 होर्डिंग धारकांवर FIR

अनधिकृत वृक्षतोड केल्याप्रकरणी आतापर्यंत 8 होर्डिंग धारकांवर पोलिसांच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, अनधिकृत वृक्षतोड केल्याप्रकरणी 9 कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याबाबत पत्रव्यवहारसुध्दा करण्यात आला असून काही प्रकरणांची तपासणी सुरू आहे. आजपर्यंत 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अशी माहिती उद्यान वृक्ष संवर्धन विभागाने दिली.

वृक्षतोड बाबत सारथीवर तक्रारी

वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने विविध प्रयत्न करुनही जाणीवपुर्वक वृक्षतोड करण्याचे काम काही जणांकडून केले जात आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये रस्त्यालगत असलेले होर्डिंग दिसत नसल्यामुळे वृक्षांची संबंधित होर्डिंग धारकांकडून विनापरवाना वृक्ष छाटणी किंवा वृक्ष तोड केली जात आहे. अशा घटना वारंवार घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच विनापरवाना वृक्षतोडीबाबत नागरिकांकडून दैनंदिन सारथी वेबपोर्टलद्वारे, लेखी याबरोबरच इतर समाज माध्यमांद्वारे तक्रारी प्राप्त होत आहेत, असे अतिरिक्त आयुक्त, प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगितले.

गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे पत्रव्यवहार

होर्डिंग किंवा जाहिरात फलकांसाठी विनापरवाना वृक्षांची वारंवार छाटणी किंवा वृक्ष पुर्णपणे काढले जात असल्याच्या घटना शहरात घडत आहेत. या प्रकरणी महापालिकेच्या वतीने होर्डिंग मालक व जाहिरातदारांविरोधात गुन्हा दाखल करुन महाराष्ट्र राज्य (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 मधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. संबंधित कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याबाबत पत्रव्यवहारही करण्यात आला असून याबाबत काही प्रकरणांमध्ये पोलिसांच्या वतीने गुन्हाही दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती रविकिरण घोडके, उप आयुक्त, उद्यान विभाग यांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पिंपरी : भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार जेष्ठ नागरिकाचा मृत्यू