Pune Accident News | पिंपरी : भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार जेष्ठ नागरिकाचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव वेगात जाणाऱ्या टाटा कंपनीच्या गुड्स कॅरिअर कंटेनरची (एमएच 14 एच यु 3751) दुचाकीला पाठीमागून धडक बसली. या अपघातात (Pune Accident News) दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि.15) सकाळी अकराच्या सुमारास भोसरी येथील रोशल गार्डन समोर झाला. याप्रकरणी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

मुरलीधर पांडुरंग लांडे (वय-70 रा. लिंबाजी तालीम, लांडगे मारुती मंदिराजवळ, भोसरी) असे मृत्यू झालेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी कंटेनर चालक जगदीश कुमार चेतराम (रा. बिखेत्तर, तहसील रामनगर जि. उधमपुर) याच्यावर आयपीसी 304(अ), 279 सह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मयत मुरलीधर लांडे यांचा मुलगा राहुल मुरलीधर लांडे (वय-33 रा. पांडुरंग कृपा बिल्डींग, लिंबाजी तालमीजवळ, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या डुडुळगाव येथे खोल्या असून त्या भाड्याने दिल्या आहेत. फिर्यादी यांचे वडील मुरलीधर लांडे हे सोमवारी सकाळी आठच्या सुमारास डुडुळगाव येथे भाडे घेण्यासाठी ज्युपीटर (एमएच 14 जी आर 6529) दुचाकीवरुन गेले होते. भाडे घेऊन ते सकाळी अकराच्या सुमारास घरी परत येत होते.

नाशिक पुणे हायवेवर रोशल गार्डन समोर मुरलीधर लांडे यांच्या दुचाकीला कंटेनरची पाठीमागून जोरात धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने मुरलीधर लांडे यांचा मृत्यू झाला. चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हयगयीने व बेदरकारपणे चालून फिर्यादी यांच्या वडिलांच्या दुचाकीला धडक देऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

कोथरुड येथे इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन पडून कामगाराचा मृत्यू, तिघांवर FIR