Pimpri Chinchwad Police | पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड पोलीस दलात ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’द्वारे 256 पोलिसांच्या बदल्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Police |पोलीस दलातील बदली (Transfer) प्रक्रियेत मोठा घोळ होत असल्याचे आरोप केले जातात. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहर पोलीस (Pimpri Chinchwad Police) दलात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे (Video conferencing) पोलिसांच्या बदल्या (Pimpri Chinchwad Police) करण्यात आल्या. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Commissioner of Police Krishna Prakash) यांनी पसंती क्रम जाणून घेत पोलिसांच्या पिंपरी-चिंचवड आयुक्तालयांतर्गत या बदल्या केल्या. अशा प्रकारे पोलिसांची बदली होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांना एक लिंक पाठवून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांच्याशी संवाद साधत या बदल्या करण्यात आल्या. कर्मचाऱ्यांनी पसंतीच्या पोलीस ठाण्याचे (police station) नाव सुचवल्यानंतर उपलब्धता तपासून आयुक्तांनी लगेच बदलीचे आदेश (Transfer order) दिले. यावेळी बदलीबाबत झटपट निर्णय झाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये समाधान पहायला मिळत आहे. तसेच बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सलग दोन दिवस सुरु होती बदली प्रक्रिया

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,
पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ (Deputy Commissioner of Police Sudhir Hiremath),
पोलीस उपायुक्त मंचक इप्पर (Deputy Commissioner of Police Manchak Ipper),
यांनी आयुक्तालयातील पोलीस अंमलदारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून त्यांच्या अडी-अडचणी व समस्या जाणून घेतल्या.
त्यांच्या पसंती क्रमांकानुसार बुधवार, गुरुवार सलग दोन दिवस ही बदली प्रक्रिया राबवली.

256 जणांच्या बदल्या

बदली झालेल्यांमध्ये सहायक पोलीस फौजदार – 30. पोलीस हवालदार – 94, पोलीस नाईक- 132 या पदावर नेमणुकीस असलेल्या एकूण 256 पोलीस अंमलदारांच्या पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत बदल्या केल्या आहे. उर्वरित 99 जणांची बदली त्यांचा पसंती क्रम जाणून घेऊन करण्यात येणार आहेत.

Web Title : Pimpri Chinchwad Police | For the first time, 256 police personnel were transferred to Pimpri-Chinchwad police force through video conferencing

Real Estate in Pune | पुण्यात रियल इस्टेटला येणार सुगीचे दिवस; झानडू रियल्टीची प्रतिष्ठित नाईकनवरे डेव्हलपर्सशी भागीदारी

Weight Lose Tips | डायटिंग अन् उपवास नव्हे तर हे केल्यानं वेगानं कमी होईल वजन, जाणून घ्या

Police Officers Transfer | पनवेल-नवी मुंबईत 600 हून अधिक पोलिसांच्या अंतर्गत बदल्या

Indian Oil | इंडियन ऑईलची जबरदस्त ऑफर ! ‘डिझेल भरा, बक्षिसं जिंका’ ऑफरमधून 2 कोटी जिंकण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या ऑफर

High Blood Pressure | उच्च रक्तदाबाचा त्रास असणार्‍या रुग्णांसाठी ‘या’ गोष्टी फार महत्वाच्या; डॉक्टरांनी सांगितले फायदे