Pimpri Chinchwad Police | पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मिळणार आणखी 1 अपर आयुक्त, 2 DCP, 4 ACP; BDDS ला देखील राज्य शासनाची मंजुरी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य पोलीस दलात सध्या मोठ्या प्रमाणावर बदल्यांची चर्चा सुरु असतानाच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात (Pimpri Chinchwad Police) तीन पदांसह बॉम्ब शोधक नाशक पथकाला (BDDS) राज्य सरकारने (Maharashtra Government) मंजुरी दिली आहे. राज्य सरकारने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात (Pimpri Chinchwad Police) एक अपर आयुक्त, दोन उपायुक्त, चार सहाय्यक आयुक्त या पदांना मंजुरी दिली आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालयात अधिकाऱ्यांची कमी असल्याने ही पदे मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात सध्य एक अपर पोलीस आयुक्त (Additional Commissioner of Police) पद मंजूर आहे. राज्य शासनाने आणखी एका पदाला मंजुरी दिल्याने आयुक्तलायता दोन अपर पोलीस आयुक्त असणार आहेत. तर सध्या तीन पोलीस उपायुक्त (Deputy Commissioner of Police) कार्यरत असून आणखी दोन पोलीस उपायुक्त पदांना राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तालयाती उपायुक्तांची संख्या 5 होणार आहे.

याशिवाय पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात सहायक पोलीस आयुक्तांची (Assistant Commissioner of Police) 8 पदे मंजूर आहेत. आयुक्तालयात अधिकाऱ्यांची संख्या अपुरी पडत असल्याने सहायक पोलीस आयुक्तांची आणखी चार पदे शासनाने मंजुर केली आहेत. यामुळे पिंपरी चिंचवड आयुक्तालयात सहयक पोलीस आयुक्तांची संख्या 12 होणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खोदकाम करत असताना ब्रिटीशकालीन बॉम्ब आढळून आला होता.
यापूर्वी देखील अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत.
बॉम्ब सदृष्य वस्तू आढळून आल्यानंतर बॉम्ब शोधक नाशक पथकाला त्या ठिकाणी पाचारण करण्यात येते.
मात्र पिंपरी चिंचवड आयुक्तालयाला स्वतंत्र बीडीएस पथक नाही.
त्यामुळे बीडीएस पथक सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता.
या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली आहे.

बीडीएस पथकाला शासनाने मंजुरी दिल्याने आयुक्तालयाला स्वतंत्र पथक मिळणार आहे.
या पथकामध्ये सध्या दोन टीम 24 तास कार्यरत असणार आहेत. प्रशिक्षित कर्मचारी व अधिकारी,
स्फोटकासंदर्भातील माहिती देण्यासाठी अद्यावत साधन सामग्री आणि प्रशिक्षित श्वान पथक यामध्ये असणार आहे.
पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बीडीएसमध्ये काम करण्याची इच्छा असेल तर त्या कर्मचाऱ्यास प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Web Title :- Pimpri Chinchwad Police | Maharashtra government approves bomb disposal squad for pimpri chinchwad police commissionerate with one additional commissioner two deputy commissioners four assistant commissioners

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Modi | ‘आपण भाग्यवान म्हणून ड्रायव्हिंग लायसन्सवर तरी आपला फोटो आहे’; पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

Maharashtra Unlock | व्यावसायिकांना मोठा दिलासा ! राज्यात 15 ऑगस्टपासून मॉल्स, दुकाने, हॉटेल्स, बार सुरु; पण मल्टिप्लेक्स, मंदिरे अन् प्रार्थनास्थळे बंदच

Toll GPS System | टोल प्लाझावरून जाणार्‍यांसाठी महत्वाची बातमी, 3 महिन्यात सुरू होणार तुमच्यासाठी नवीन सुविधा; जाणून घ्या