Pimpri Chinchwad Police MCOCA Action | सराईत गुन्हेगार रिंकू चौहाण टोळीवर ‘मोक्का’, पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 21 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Police MCOCA Action | पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड शहरात संघटीत गुन्हे करणाऱ्या अमर उर्फ रिंकू कुलवंतसिंग चौहाण याच्यासह त्याच्या इतर 4 साथीदारांवर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे (IPS Vinoy Kumar Choubey) यांनी मोक्का कारवाई MCOCA (Mokka Action) केली आहे. पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत तब्बल 21 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर (MCOCA On Organised Gangs In Pune) मोक्का कायद्यान्वये कारवाई करुन 209 अट्टल गुन्हेगारांवर मोक्का कारवाई केली आहे. (Pimpri Chinchwad Police MCOCA Action )

टोळी प्रमुख अमर उर्फ रिंकू कुलवंतसिंग चौहाण (वय-33 रा. नेहरुनगर पिंपरी) टोळी सदस्य रोहित प्रविण धनवे (वय-20 रा. महेशनगर पिंपरी), अक्षय आण्णा रणदिवे (वय-29 रा. खंडे वस्ती, भोसरी), साहिल सुधीर धनवे (वय-20 रा. प्रगती शाळेजळ, महेशनगर, पिंपरी), सोन्या रणदिवे (रा. नेहरुनगर, पिंपरी) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (Pimpri Chinchwad Police MCOCA Action) टोळी प्रमुख अमर उर्फ रिंकू चौहाण याने साथीदारांसह तसेच काही नवीन साथीदारांना सोबत घेऊन टोळी तयार करुन आर्थिक फायद्यासाठी तसेच टोळीच्या वर्चस्व व दहशत पसरवण्यासाठी गुन्हे केले आहेत.

रिंकू चौहाण याने पिंपरी (Pimpri Police Station), बंडगार्डन (Bund Garden Police Station), निगडी (Nigdi Police Station), भोसरी (Bhosari Police Station), येरवडा (Yerawada Police Station), विश्रांतवाडी (Vishrantwadi Police Station), समर्थ (Samarth Police Station), सहकारनगर (Sahakar Nagar Police Station), एमआयडीसी भोसरी (MIDC Bhosari Police Station), विमानतळ (Viman Nagar Police Station), चिंचवड (Chinchwad Police Station), चंदननगर पोलीस ठाण्याच्या (Chandan Nagar Police Station) हद्दीत खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), कट रचणे, पुरावा नष्ट करणे, अपहरण (Kidnapping), दरोड्याची तयारी (Robbery), जबरी चोरी, खंडणी (Extortion), दुखापत करणे, वाहनांची तोडफोड करणे, विनापरवाना शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे केले आहेत.

या टोळीने 38 एकत्र गुन्हे केले असून स्वतंत्रपणे 12 गंभीर गुन्ह्यांसह 32 गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपींवर पिंपरी पोलीस ठाण्यात आयपीसी 397, 394, 384, 323 504, 506, 143, 147, 149, आर्म अॅक्ट (Arm Act),
महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट
(Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्यात मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने
(Senior PI Ram Rajmane) यांनी पोलीस आयुक्त परिमंडळ 1 विवेक पाटील (DCP Vivek Patil) यांच्या मार्फत
अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी (Addl CP Vasant Pardeshi) यांच्याकडे सादर केला. या अर्जाची छाननी करुन
अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.
पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त सतीश कसबे (ACP Satish Kasbe) करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे (Joint CP Dr. Sanjay Shinde),
अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे स्वप्ना गोरे (DCP Swapna Gore), पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 विवेक पाटील, सहायक पोलीस आयुक्त सतिश कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.सी.बी. बाळकृष्ण सावंत (P.C.B. Crime Branch Balkrishna Sawant), वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी, पी.सी.बी. गुन्हे शाखा सहायक पोलीस फौजदार अनिल गायकवाड, ओंकार बंड, दत्ताजी कौठेकर यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Governor Nominated MLC | राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा फॉर्म्युला ठरला; भाजपबरोबरच शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादीलाही संधी

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कौतुक; म्हणाले, “अजित पवार प्रामाणिक…”

Pune Crime News | वारजे माळवाडीमध्ये सेंट्रिंग काम करताना इमारतीवरुन पडून कामगाराचा मृत्यु; कन्स्ट्रक्शन मालक व ठेकेदारावर गुन्हा दाखल

PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा 14 वा हप्ता आज मिळणार; राजस्थानमधून पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार वितरण

Maharashtra Rain Update | राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईसह काही भागात शाळांना सुट्टी