Maharashtra Rain Update | राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईसह काही भागात शाळांना सुट्टी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rain Update | मुंबई (Mumbai), ठाण्यासह (Thane) उपनगरात मुसळधार पाऊस (Maharashtra Rain Update) पडत आहे. तसेच, कोकण (Konkan) आणि विदर्भासह (Vidarbha) पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) काही जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस झाला आहे. दरम्यान, हवामान खात्याने (Indian Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, आज (गुरूवार) राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आज मुंबईसह कोकण विभागातही मुसळधार पावसाची (Maharashtra Rain Update) शक्यता आहे. रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), सिंदुधुर्ग (Sindudhurg), कोल्हापूर (Kolhapur) आणि सातारा (Satara) या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. तर पुणे (Pune) जिल्ह्यात रेड अलर्ट (Red Alert) देण्यात आला आहे. दुसरीकडे संपूर्ण विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर मराठवाड्यातील (Marathwada) काही जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, आज मुंबई महानगराला दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केल्यामुळे सर्व शासकीय
आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा (School Holidays) तसेच सर्व महाविद्यालयांना
आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित झाली असून,
वायव्य दिशेला तिची हालचाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी चार ते पाच दिवसामध्ये महाराष्ट्रात पावसाचा
जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपले असून जिल्ह्यातील जनजीवनावर
त्याचा परिणाम दिसू लागला आहे. रात्री 11 वाजता शासकीय अहवालानुसार जिल्ह्यातील नद्या धोक्याच्या पातळीवरून
वाहत आहे तर शास्त्री, बाव नदी, काजळी नदी आणि कोदवली या चार नद्या इशारा पातळीच्या वरून वाहत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Governor Nominated MLC | राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा फॉर्म्युला ठरला; भाजपबरोबरच शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादीलाही संधी

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कौतुक; म्हणाले, “अजित पवार प्रामाणिक…”