Pimpri Chinchwad Police MCOCA Action | पिंपरी : चिखली परिसरातील राहुल यादव टोळीवर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची ‘मोक्का’ कारवाई

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Police MCOCA Action | वर्चस्व आणि आर्थिक फायद्यासाठी गुन्हेगारांची टोळी तयार करुन गुन्हे करणाऱ्या चिखली परिसरातील राहुल यादव व त्याच्या चार साथीदारांवर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील चार संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील 24 आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

टोळी प्रमुख राहुल प्रल्हाद यादव (वय 32, रां. कुदळवाडी, चिखली), नागेश गुलचंद सूर्यवंशी (वय 28, रा. सोळू, ता. खेड), रोहन भानुदास यादव (वय 21, रा. रामदास नगर, चिखली), आशिष भीमराव बजलव (वय 27, रा. कुदळवाडी, चिखली), राजेश बहरीच निसाद (वय 32, रा. कुदळवाडी, चिखली) अशी मोका कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत. टोळी प्रमुख व त्याच्या साथीदारांवर सात गंभीर गुन्हे दाखल आहेत.

टोळी प्रमुख राहुल यादव याने स्वत:चे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित करण्यासाठी गुन्हेगारांची टोळी तयार केली. या टोळीने चिखली, आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुन, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दंगा, मारामारी, बेकायदेशीर जिवघेणी हत्यारे जवळ बाळगणे, अशी गंभीर गुन्हे केले आहेत.(Pimpri Chinchwad Police MCOCA Action)

चिखली पोलीस ठाण्यात आयपीसी 302, 307, 326, 323, 364, 143, 147, 148, 149, 504, 506, आर्म अॅक्ट,
महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3
(1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांच्याकडे सादर करण्यात आला होता.
या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदिप डोईफोडे,
पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त विवेक मुगळीकर,
सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर,
सहायक पोलीस निरीक्षक निता उबाळे, पीसीबी गुन्हे शाखा सहायक पोलीस निरीक्षक वर्षा जगदाळे,
पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी, महिला पोलीस हवालदार केदार यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Court News | बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला पुणे न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

CP Amitesh Kumar At Vidyapeeth Chowk | पुणे पोलीस आयक्तांची विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीची पाहणी, आयुक्तांचा रुद्रावतार पाहून अधिकाऱ्यांची उडाली भांबेरी

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : विकसन करारनाम्यातील अटी शर्तींचा भंग, बिल्डर रितेश वासवानी याला अटक