Pune Court News | बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला पुणे न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Court News | इंन्स्टाग्रामवर (Instagram) महिलेसोबत ओळख करुन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relation) ठेवले. त्यानंतर संबंध ठेवतानाचे अश्लील व्हिडिओ व फोटो व्हायरल करुन महिलेची बदनामी करणाऱ्या आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.बी. राठोड यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अशी माहिती आरोपीचे वकील ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर यांनी दिली. हा प्रकार जून 2023 मध्ये औंध बोपोडी (Aund Bopodi) येथे घडला आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) गुन्हा दाखल केला आहे.(Pune Court News)

ऋषिकेश रोहिदास हजारे (रा. इंद्रायणीनगर, भोसरी) असे अटकपूर्व जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 32 वर्षीय महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन ऋषिकेश हजारे याच्यावर आयपीसी 376, 323, 506 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Rape Case)

आरोपी आणि फिर्य़ादी यांची ओळख इंन्स्टाग्रामवर झाली. आरोपीची मुलगी ही फिर्यादी यांची मुलगी शिकत असलेल्या शाळेतच शिकत आहे असे सांगून ओळख करून नंतर जवळीक वाढवून फोनवरून संपर्क करणे आणि फिर्यादी यांना भेटत होता. आरोपीने महिलेसोबत जवळीक वाढवून तिच्या पतीसोबत ओळख करुन घेतली. आरोपी महिलेच्या घरी आला त्यावेळी त्याला चहा देत असताना आरोपीने महिलेचा हात पकडून गैरवर्तन केले. तसेच अश्लील बोलून धमकी दिली. यानंतर आरोपीने जबरदस्तीने महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच शारीरिक संबंधाच्या वेळी मोबाईलमध्ये अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवला. हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करुन महिलेची बदनामी केली. याबाबत महिलेने आरोपी विरोधात खडकी पोलिसांकडे तक्रार केली.

या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी आरोपीने ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर यांच्या मार्फत अतिरिक्त सत्र न्यायालयात अर्ज केला होता.
सुनावणी दरम्यान ॲड. जितेंद्र जानापुरकर यांनी युक्तिवाद करून आरोपी तर्फे बाजू मांडली.
त्याचप्रमाणे सरकारी वकील आणि फिर्यादीतर्फे देण्यात आलेले खाजगी वकील यांनी देखील त्यांची बाजू मांडली.
तसेच खडकी पोलीस स्टेशन तर्फे तपासी अंमलदार यांनी जामीन मिळू नये यासाठी कोर्टात रिपोर्ट तसेच काही
कागदपत्रे दाखल केली होती.

या सर्व बाबींचा विचार करता आणि दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला असता कोर्टाच्या निदर्शनानुसार फिर्यादी ही विवाहित महिला (वय 32 वर्ष) आहे. तर आरोपी अर्जदाराचे वय 27 वर्षे आहे. त्यांच्यात सहमतीने शारीरिक संबंध असण्याची शक्यता आहे. असे असूनही अर्जदाराचे गुन्हेगारी दायित्व आणि माहिती देणार याच्या सामग्रीचे मापदंड हे चाचणीचे विषय आहे. तपासाची कागदपत्रे ठोस तपास पूर्ण झाल्याचा खुलासा करत आहेत. तपास पूर्ण करण्यासाठी अर्जदार आरोपी याला ताब्यात घेणे आवश्यक नाही. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असला तरी पुढील तपासासाठी आरोपीची कोठडी आवश्यक नाही. दुसरीकडे त्याच्या अटकेची भीती रास्त आहे. अटकेमुळे त्याला त्रास होऊ शकतो. या सर्व परिस्थितीचा विचार करता न्यायाधीश एस. बी. राठोड यांनी आरोपीचा अटी व शर्तीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lok Sabha Polls | दांडगा जनसंपर्क व नातेवाईकांच्या गोतावळ्याची शिवाजी मानकर यांना ताकद, पुणे लोकसभेसाठी प्रबळ दावेदार

Sanjay Raut-Sharad Pawar-PM Narendra Modi | पवारांनी राजकारणापलिकडे जाऊन केलेली मदत मोदींनीच वारंवार सांगितली : संजय राऊत

दाजीकडून अल्पवयीन मेहुणीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड; वडगाव भागातील प्रकार

इन्स्टाग्रामवर ओळख करुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, बिबवेवाडी भागातील घटना

Pune Sinhagad Road Crime | शेअर बाजार मार्गदर्शकावर शस्त्राने वार, सिंहगड रस्ता परिसरातील प्रकार

Pune PMC News | बायोमायनिंग करून मोकळया केलेल्या जागेवर पुन्हा ‘रिजेक्ट’ कचर्‍याच्या ‘लँडिफिलिंग’ची निविदा

Hemant Jogdeo | ज्येष्ठ क्रीडा पत्रकार हेमंत जोगदेव यांचे निधन

Pune Crime News | विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, तिघांवर गुन्हा दाखल