Pune CP Amitesh Kumar At Vidyapeeth Chowk | पुणे पोलीस आयुक्तांकडून विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीची पाहणी, आयुक्तांचा रुद्रावतार पाहून अधिकाऱ्यांची उडाली भांबेरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune CP Amitesh Kumar At Vidyapeeth Chowk | पुणे मेट्रो (Pune Metro) आणि उड्डाण पुलाच्या कामामुळे पुणे शहरातील विद्यापीठ चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. या वाहतूक कोंडीची पाहणी करण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी दुपारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी रस्त्यावरील खड्डे, जागोजागी पडलेली वाळू आणि अस्ताव्यस्त बॅरिकेट यावरून त्यांनी पुणे महापालिका Pune Municipal Corporation (PMC) आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. आयुक्तांचा रुद्रावतार पाहून अधिकाऱ्यांची भांबेरी उडाली. आयुक्तांनी अचानक भेट दिल्याने अधिकाऱ्यांची धांदल उडाल्याचे पाहायला मिळाले.(Pune CP Amitesh Kumar At Vidyapeeth Chowk)

विद्यापीठी चौकात सुरु असलेल्या कामांमुळे याठिकाणी दररोज मोठी वाहतूक कोंडी होत असते. याचे खापर सोशल मीडियातून पुणे वाहतूक शाखेवर फोडले जाते. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन स्वत: पोलीस आयुक्त विद्यापीठ चौकात आले. यावेळी त्यांनी विद्यापीठ चौक, बाणेर, पाषाण आणि सुस रोडची पाहणी केली. रस्त्यावर पडलेली अस्ताव्यस्थ खडी आणि खड्ड्यांमुळे वाहनचालकांना करावी लागणार कसरत पाहून त्यांचा पारा अधिकच वाढला. याप्रकरणी त्यांनी महापालिका अधिकारी व मेट्रोच्या अधिकाऱ्यांना कडक शब्दात धारेवर धरले.

खड्डे, खडी आणि अस्ताव्यस्थ बॅरिकेटसमुळे वाहतूक संथ होत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत असल्याचे अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. ही कामे किती दिवसांत करणार? असा सवाल आयुक्तांनी अधिकाऱ्यांना विचारला. त्यांचा राग पाहून अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. यावेळी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील (IPS Manoj Patil) आणि वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate) उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lok Sabha Polls | दांडगा जनसंपर्क व नातेवाईकांच्या गोतावळ्याची शिवाजी मानकर यांना ताकद, पुणे लोकसभेसाठी प्रबळ दावेदार

Sanjay Raut-Sharad Pawar-PM Narendra Modi | पवारांनी राजकारणापलिकडे जाऊन केलेली मदत मोदींनीच वारंवार सांगितली : संजय राऊत

दाजीकडून अल्पवयीन मेहुणीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड; वडगाव भागातील प्रकार

इन्स्टाग्रामवर ओळख करुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, बिबवेवाडी भागातील घटना

Pune Sinhagad Road Crime | शेअर बाजार मार्गदर्शकावर शस्त्राने वार, सिंहगड रस्ता परिसरातील प्रकार

Pune PMC News | बायोमायनिंग करून मोकळया केलेल्या जागेवर पुन्हा ‘रिजेक्ट’ कचर्‍याच्या ‘लँडिफिलिंग’ची निविदा

Hemant Jogdeo | ज्येष्ठ क्रीडा पत्रकार हेमंत जोगदेव यांचे निधन

Pune Crime News | विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, तिघांवर गुन्हा दाखल