Pimpri Chinchwad Police MPDA Action | पिंपरी परिसरातील कुख्यात गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Police MPDA Action | आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतील अभिलेखावरील गुन्हेगार तपासून त्यांच्यावर मोका व एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येत आहेत. पिंपरी पोलीस ठाण्याच्या (Pimpri Police Station) हद्दीतील अट्टल गुन्हेगार वैभव हातांगळे याला पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे (Vinay Kumar Choubey) यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

वैभव चोखोबा हातांगळे (वय-24 रा. बनसाळ गल्ली, गांधीनगर, पिंपरी) असे स्थानबद्ध केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. आरोपीने पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयत्यासारखी जीवघेणे हत्यारांसह फिरताना गंभीर दुखापत करणे, दुखापत करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यासारखे 7 गंभीर गुन्हे केले आहेत.(Pimpri Chinchwad Police MPDA Action)

वैभव हातांगळे याच्यावर एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी वैभव हातांगळे याला एम.पी.डी.ए कायद्यान्वये येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

ही करावाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदिप डोईफोडे,
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देवडे, गुन्हे शाखा, पी.सी.बी. चे पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे,
पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी, ओंकार बंड यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parkash Ambedkar On Election Commission | महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान कशासाठी? निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावं, प्रकाश आंबेडकर यांची मागणी

Baramati Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची रणनीती उद्या ठरणार, समन्वय समितीची बारामतीत बैठक