Pimpri Chinchwad Police News | बनावट नोटा तयार करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; निगडी पोलिसांकडून 33 लाखांचा मुद्देमाल जप्त (PHOTOS)

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – बनावट नोटा तयार करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा पिंपरी-चिंचवड पोलिस (pimpri chinchwad police) आयुक्तालयातील निगडी पोलिसांनी पर्दाफाश (Fake Currency Racket Exposed) केला आहे. निगडी पोलिसांनी (Nigdi Police) 6 जणांना पंढरपूर, सातारा, मुंबई आणि गुजरात येथून अटक केली आहे. आरोपींकडून 32 लाख 67 हजार रुपये किंमतीच्या 2000 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा (Fake Currency) जप्त केल्या आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस (pimpri chinchwad police) आयुक्तालयातील निगडीतील ओटास्कीम येथून सुरु झालेल्या या कारवाईचा शेवट गुजरातमधील बनासकाठा जिल्ह्यातील पालनपुर येथे झाला. पोलिसांनी गुजरातमधून 3 आणि महाराष्ट्रातून 3 जणांना अटक केली आहे.

Harshwardhan Jadhav | ‘महाराजांची गादी श्रेष्ठ, संभाजीराजेंनी भाजपाच्या खासदारकीवर लाथ मारायला हवी, दुटप्पी भूमिका नको’

गोरख दत्तात्रय पवार (वय-30 रा. भाळवणी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर), विठ्ठल गजानन शेवाळे (वय-38 रा. ढेबेवाडी, ता. पाटण, जि. सातारा), जितेंद्र रंकनीधी पाणीग्रही (वय-36 रा. नालासोपारा (पुर्व) वसई पालघर), राजू उर्फ रणजीत सिंह खतुबा परमार (वय-38 रा. रानपुर काकरिया चौरा, ता. रानपूर. जि. बोटाद, गुजरात), जितेंद्रकुमार नटवरभाई पटेल (वय-26), किरम कांतीलाल पटेल (वय-38, दोघे रा. पालनपुर, जि. बासकाठा राज्य गुजरात) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

अशी झाली कारवाईला सुरुवात

निगडी परिसारातील ओटास्किम येथे एक इसम बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस त्या व्यक्तीच्या पाळतीवर होते. निगडी पोलिसांनी ग्राहक शोधण्यासाठी ओटास्किमजवळ आलेल्या आरोपी गोरख पवार याला 23 जून रोजी ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे दोन हजार रुपयांच्या 50 नोटा आढळून आल्या. याशिवाय त्याच्याकडे असलेल्या दुचाकीच्या डीकीत (एमएच 13 डीएल 0285) दोन हजाराच्या नोटांचे चार बंडल आढळून आले.

पोलिसांनी जप्त केलेल्या नोटांची बँकेकडून परिक्षण करुन घेतले. यामध्ये या सर्व नोटा बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी गोरख पवार याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करुन त्याची पोलीस कोठडी घेऊन अधिक चौकशी केली.

सातारा जिल्ह्यातून एकाला अटक

आरोपी गोरख पवार याच्या पोलीस कोठडीत (Police custody) केलेल्या चौकशीत त्याने विठ्ठल शेवाळे याने नोटा दिल्याची कबुली दिली. पोलिसांनी शेवाळे याला सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील गावातून पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना 2000 रुपयांच्या 80 आणि 500 रुपयांच्या 21 नकली नोटा असे एकूण 3 लाख 70 हजार रुपये किंमतीच्या बनावट नोटा आढळून आल्या.

नालासोपारा कनेक्शन आलं समोर

आरोपी शेवाळे याच्याकडे सखोल चैकशी केली असता त्याने नालासोपारा येथील जितेंद्र पाणीग्रही याच्याकडून नोटा आणल्याची माहिती दिली. निगडी पोलिसांनी जितेंद्रच्या घरी गेले असता त्याला दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) बनावट नोटांच्या प्रकरणात अटक केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपी जितेंद्रला न्यायालयातून वर्ग करुन घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता या प्रकरणची मुळे गुजरात मध्ये असल्याचे उघड झाले.

गुन्ह्याचे गुजरात कनेक्शन उघड

आरोपी जितेंद्र याच्याकडे केलेल्या चौकशीत गुजरातमधील राजू परमार याच्याकडून नोटा घेतल्याचे सांगितले. राजूचा पत्ता माहिती नसल्याने पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे राजू परमारचा शोध घेतला. पोलिसांनी गुजरातमधील म्हैसाना येथे आरोपी राजूला एका लॉजवर बोलावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने येण्यास टाळाटाळ केली.

राजूला पकडण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहकाचा बनाव केला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे राजूचा ठावठिकाणा शोधून काढला. त्यावेळी तो बनासकाठा जिल्ह्यातील पालनपुर येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी पालनपुरला जाऊन आरोपी राजूच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडे असलेल्या प्लास्टीकच्या पिशवीत 15 लाख 93 हजार रुपये किमतीच्या 2000 रुपयाच्या 600 आणि 500 रुपयाच्या 786 बनावट नोटा जप्त केल्या.

आणखी दोघांना ठोकल्या बेड्या

आरोपी राजू परमारकडे केलेल्या चौकशीत त्याच्याकडील बनावट नोटा जितेंद्रकुमार आणि
किरणकुमार यांच्याकडून आणल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी जितेंद्रकुमार आणि
किरणकुमार यांना घरातून ताब्यात घेतले. त्यांना पालनपुर येथील न्यायालयात हजर करुन ट्रान्झिट
रिमांड मंजूर करुन घेतले. त्यानंतर दोन्ही आरोपींकडून बनावट नोटा बनवण्यासाठी वापरलेले
लॅपटॉप आण कलर प्रिंटर जप्त केले.

सलग 18 दिवस तपास

निगडी पोलिसांनी 24 जून पासून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली होती. त्यानंतर तब्बल 18
दिवस या प्रकरणाचा तपास करुन 6 आरोपींना अटक केली. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास मुंबई, पुणे,
सातारा आणि गुजरात येथे केला. या कारवाईत पोलिसांनी 2000 रुपयांच्या 1402, 500 रुपयांच्या
929, दुचाकी, लॅपटॉप, प्रिंटर असा एकूण 33 लाख 37 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.




ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Commissioner of Police Krishna Prakash),
अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (Additional Commissioner of Police Ramnath
Pokale), पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मंचक इप्पर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस निरीक्षक गुन्हे कृष्णदेव
खराडे, पोलीस निरीक्षक सायबर शाखा डॉ. संजय तुंगार, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण
सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक आर.बी. बांबळे तपास पथकातील कर्मचारी किशोर पढेर, विक्रम
जगदाळे, आनंद साळवी, सतिश ढोले, राजु जाधव, विनोद व्होनमाने, राहुल मिसाळ, विजय बोडके,
रमेश मावसकर, भुपेंद्र चौधरी, तुषार गेंगजे, विलास केकाण, दिपक जाधवर, अमोल साळुंखे,
विकास आवटे, महिला पोलीस नाईक मनीषा पाटील यांच्या पथकाने केली.



|




 

हे देखील वाचा

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pimpri Chinchwad Police News | Nigadi police bust inter-state fake currency racket, 6 held with Rs 32.69 lakh in counterfeit notes  

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update