Harshwardhan Jadhav | ‘महाराजांची गादी श्रेष्ठ, संभाजीराजेंनी भाजपाच्या खासदारकीवर लाथ मारायला हवी, दुटप्पी भूमिका नको’

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Harshvardhan Jadhav | मागील महिन्यात राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे (MP Chhatrapati Sambhaji Raje) यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha reservation) राज्यभर मूक आंदोलने करण्यात आले. त्यावेळी मराठा समाज आक्रमक झाला होता. मात्र मराठा आरक्षणाविषयी अद्याप तोडगा निघाला नाही. या मुद्यावरून आता कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी प्रतिक्रिया देत खा. संभाजीराजेंना सल्ला दिला आहे.

Online Banking | बँक खात्यातून कुणी पैसे गायब केल्यास काय करावे?, कशी परत मिळेल सर्व रक्कम; जाणून घ्या

माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे उस्मानाबाद येथे बोलत असताना म्हणाले, ‘मराठा आरक्षणावरून (Maratha reservation) कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे (MP Chhatrapati Sambhaji Raje) राज्यभर दौरा करत आहेत. संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभारलं जात आहे. पण, भाजपात राहून खासदारकी ठेवायची आणि आंदोलन करायचं ही दुटप्पी भूमिका घेणे योग्य नाही. छत्रपती संभाजीराजेंनी भाजपाच्या खासदारकीला लाथ मारायला हव, असे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं आहे.

NCP | आधी व्यवस्थेची माहिती करुन घ्या, पटोलेंच्या पाळत ठेवण्याच्या विधानावर राष्ट्रवादी संतापली (व्हिडिओ)

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘खासदारकी-आमदारकीपेक्षा महाराजांची गादी श्रेष्ठ आहे. छत्रपती संभाजीराजेंनी सर्वप्रथम खासदारकीचा राजीनामा द्यायला हवा. आंदोलनाचं नेतृत्व करताना खासदारकी ठेवायची आणि आंदोलन करायचं ही दुटप्पी भूमिका घेणे योग्य नाही. असं जाधव म्हणाले. पुढे म्हणाले, येत्या 9 ऑगस्ट क्रांती दिनी दिल्लीत धरणं आंदोलन करणार असून खा. संभाजीराजेंनी या आंदोलनात सहभागी व्हावे असं आवाहन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केलं आहे. दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांच्या या भूमिकेवर आता खा. संभाजीराजे काय प्रतिक्रिया देतात हे महत्वाचे ठरणार आहे.
Maharashtra Monsoon Update | आगामी चार दिवस पुण्यासह, कोकणात जोरदार पावसाची शक्यता

या दरम्यान, ‘कोल्हापूर येथील मूक आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने मराठा समाजाच्या
(Maratha reservation) मागण्यांसंबंधी चर्चा करण्यासाठी निमंत्रण दिले. यासाठी पालकमंत्री
सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेतला. समाजाला न्याय मिळवून
देण्यासाठीच मी सरकारशी संवाद साधला. याचा अर्थ मी मॅनेज झालो, असे काढणे चुकीचे आहे.
छत्रपती घराण्याचा वारस असल्याने मी मॅनेज होणार नाही, असं खा. संभाजीराजे छत्रपती यांनी केले
होते. तसेच, राजर्षी शाहू महाराजांनी समानतेचा विचार मांडला. त्यांचा वारसदार म्हणून मी
ओबीसीचे काढून मराठा समाजाला आरक्षण द्या, ओबीसीतून आरक्षण द्या, अशी भूमिका घेणार
नाही. असं देखील त्यावेळी संभाजीराजे म्हणाले होते.


ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Harshwardhan Jadhav | maratha reservation chhatrapti sambhaji raje should kick bjp mp says ex mla harshwardhan jadhav

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update