पिंपरी-चिंचवड शहरात बंदला हिंसक वळण

ADV

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेनंतर शहरात हिंसक वळण लागले. रावेत आणि वाल्हेकरवाडी भागात टोळक्‍याने दुकानांवर दगडफेक केली. फुगेवाडी परिसरात बसवर दगडफेक करण्यात आली. यामुळे अघोषित बंदला हिंसक वळण लागले. तर द्रुतगती महामार्गावर किवळे येथे रस्ता रोखो करून आंदोलन करण्यात आले.

ADV

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने चिंचवडगावात श्रद्धांजली आणि निषेध सभा सुरू होती. सभा संपल्यानंतर रावेत परिसरातील दोन दुकानांवर तर चिंचवडच्या वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा परिसरात दहा ते बारा दुकानांवर दगडफेक केली. त्यामध्ये एचडीएफसी बॅंकेच्या एमटीएम आणि नेहा मोटर्स कंपनीच्या शोरूमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर एक टोळके चिंचवडच्या विविध भागांमध्ये फिरून बंदसाठी व्यापाऱ्यांना दमदाटी करीत होते.
[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’774d8b58-931f-11e8-8c32-2b1a30cbc61d’]
फुगेवाडी परिसरामध्ये पीएमपीएमएलच्या (एमएच-12-एफसी-3343) या बसवरही दगडफेक करण्यात आली. मात्र सुदैवाने यात कोणीही प्रवासी जखमी झालेला नाही.

अचानक पुणे-मुबंई द्रुतगती महामार्गावर किवळे येथे मोठ्या संख्येने तरूण रस्त्यावर आले. किवळे येथे महामार्गावर ठिय्या करुन रस्ता रोको करण्यात आला. रस्ता रोको केल्याची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस त्या ठिकाणी पोहचले. पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा करुन महामार्ग पूर्ववत सुरु केला. मात्र यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाली होती.