Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 156 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Chinchwad Corona) दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. ही शहराला दिलासा देणारी बाब आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 156 नवीन रुग्ण (Pimpri Chinchwad Corona) आढळून आले आहेत. तर 04 रुग्णांच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Pimpri Chinchwad Municipal Corporation) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 156 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 63 हजार 306 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 164 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 57 हजार 902 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 1 हजार 073 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे.
आज दिवसभरात 04 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 03 रुग्ण शहरातील आहेत. तर 01 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4331 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी (दि.24) शहराम
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 15 हजार 657 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 9 लाख 70 हजार 191 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Title : Pimpri Corona | 156 new patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad in last 24 hours, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Weather Forecast | आज पुण्यासह 6 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या कशी असेल कोकणातील स्थिती ?

Vaccination Under 18 | व्हॅक्सीनसंबंधी आली खुशखबर ! सप्टेंबरपासून सुरू होईल 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचे लसीकरण !

BJP MLA Suresh Dhas | भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या विरोधात महिलेची तक्रार, धस यांच्यासह 38 समर्थकांवर FIR, बीडमध्ये खळबळ