Pimpri Crime Branch | पिंपरी : कामगारांनीच चोरले कंपनीतील इम्पोर्टेड रबरी पार्ट, गुन्हे शाखेकडून आरोपी गजाआड; पावणे सात लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Crime Branch | कंपनीतून डिस्पॅच होणारा पावणे दोन लाख रुपयांचा माल चोरून नेणाऱ्या एकाला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीकडून 6 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही घटना सोमवारी (दि.8) जयश्री पॉलीमर्स एक्सपोर्ट या महाळुंगे येथे घडली असून आरोपीला चिखली (Chikhali) येथून अटक केली आहे.

याप्रकरणी प्लँन्ट मॅनेजर अतुल सुभाष पिंगळे (वय 45 रा.मॅक्सीमा सोसायटी, वाकड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Mahalunge MIDC Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी शफिक यासीन पठाण (वय 49 रा.वडगाव मावळ) याला अटक केली आहे. तर त्याचा साथीदार सनी महादेव भिवरकर याच्यावर आयपीसी 381, 408, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.(Pimpri Crime Branch)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे जयश्री पॉलीमर्स एक्सपोर्ट प्रा. लि. येथे कामगार आहेत. त्यांनी आपसात संगनमत करून शफिक याच्या ताब्यातील वाहनामध्ये दुचाकी व चारचाकी गाड्यांचे वेगवेगळ्या प्रकारची 1 लाख 81 हजार 242 रुपयांचे पार्ट (होजेस) सिक्युरिटी चेक चुकवून कंपनी बाहेर चोरुन नेले.

दरम्यान, खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी व कर्मचारी चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते.
त्यावेळी पोलीस अमलदार निशांत काळे यांना माहिती मिळाली की, टाटा पिकअप गाडी (एमएच 14 जे.एल. 5084)
यामधून चोरीचा मला घेऊन एकजण चिखले येथे विक्री करण्यासाठी येणार आहे.
त्यानुसार पथकाने सापळा रचून शफिक पठाण याला ताब्यात घेतले.
त्याच्या कडून महाळुंगे येथील कंपनीतून चोरलेले एक लाख 75 हजार रुपयांचे दुचाकी व चारचाकी वाहनांचे रबरी पार्ट
व गुन्ह्यात वापरलेले पाच लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन जप्त केले.
गाडीतील मालाबाबत चौकशी केली असता सनी भिवरकर याच्या मदतीने चोरल्याची कबुली दिली.
पुढील कार्यवाही करीता आरोपीला महाळुंगे एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदिप डोईफोडे,
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुनिल भदाणे, पोलीस अंमलदार निशांत काळे, शैलेश मगर, प्रदीप गायकवाड, भारत गाडे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Satara Lok Sabha Election 2024 | अखेर साताऱ्याचा उमेदवार ठरला, शरद पवारांनी सोशल मीडियावरून ‘हे’ नाव केले जाहीर

Pimpri Police Raid On Spa Center | पिंपरी : स्पा सेंटरवर छापा! वाकडमध्ये सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, 3 तरुणींची सुटका (Video)

Baramati Lok Sabha Eelction 2024 | बारामतीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी मैदानात?, पंतप्रधानांच्या सभेसाठी नेत्यांचे प्रयत्न, ‘या’ ठिकाणी होऊ शकते प्रचारसभा