Pimpri Crime Branch Raid On Spa Center | पिंपरी : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, चार पीडित मुलींची सुटका

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Crime Branch Raid On Spa Center | स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दलालांवरती कारवाई करून चार पीडित महिलांची सुटका केली. ही कारवाई पिंपरी चिंचवड गुन्हे शेखेच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने निगडी येथील इन्स्प्रिया मॉलमधील (Inspiria Mall in Nigdi) फोनीक्स स्पा सेंटरमध्ये (Phoenix Spa Center) केली. याप्रकरणी दोन दलालांना ताब्यात घेण्यात आले आहे.(Pimpri Crime Branch Raid On Spa Center)

याप्रकरणी महिला पोलीस शिपाई सोनाली विलास माने (वय-30) यांनी निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन स्पा मॅनेजर महिला आरोपी, स्पा मालक दिनेश कुमार गुप्ता Dinesh Kumar Gupta (वय 30 रा. मुंबई) यांच्यावर आयपीसी 370(3), 34 सह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3, 4, 5, 7 नुसार गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे. एक महिला आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहेत.

पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथील निगडीमध्ये स्पाच्या नावाखाली काही दलाल स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैद्यरित्या मुलींना स्पाचे नावाखाली जास्त पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करवून घेत आहेत, अशी माहिती माहिती अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्राप्त झाली. निगडी पोलीस स्टेशन हद्दीतील इन्स्पेरिया मॉल मधील चौथ्या मजल्यावरील शॉप नंबर 403, 404 मधील फोनिक्स स्पा (Phoenix Spa) येथे बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली. खात्री झाल्यानंतर पथकाने अचानक छापा टाकला.

त्यावेळी आरोपींच्या ताब्यातून चार मुलींची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे.
आरोपींनी पीडित मुलींना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्या स्पा सेंटरमध्ये ठेवले होते
. आरोपी त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होते.
यातून मिळणाऱ्या पैशातून स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपींना ताब्यात घेऊन निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे,
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील
पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस अंमलदार, मारुती करचुडे भगवंता मुठे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, रेश्मा झावरे,
सोनाली माने यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar On BJP | भाजपने पक्ष फोडताना पवार कुटुंबही फोडले; रोहित पवार यांची खंत

Indapur Firing Case | इंदापूर गोळीबार प्रकरण: सराईत गुन्हेगार अविनाश धनवेचा पुर्ववैमनस्यातून खून, ग्रामीण पोलिसांकडून 4 जणांना अटक (Video)