Pimpri Crime News | आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन बिल्डर मेहतासह 7 जणांवर गुन्हा दाखल; पार्किंगसाठी सोय करुन देतो सांगून केली होती फसवणूक

पिंपरी न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pimpri Crime News | तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन आळंदी पोलिसांनी (Alandi Police) त्याची पत्नी, सासू, सासरे यांच्यासह 7 जणांविरुद्ध गुन्हा (Pimpri Crime News) दाखल केला आहे. स्रेहल योगेश शिंदे, विजया चंद्रकांत माने, चेतन चंद्रकांत माने, सुमन किरण माने, किरण महादेव माने, अभिजित किरण माने आणि बिल्डर मेहता (mehta builder) अशी गुन्हा दाखल (Pimpri Crime) झालेल्यांची नावे आहेत.

योगेश विलास शिंदे (वय ३६, रा. तनिष्क सावली सासोयटी, चर्‍होली) असे आत्महत्या (Suicide) केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ सुखदेव विलास शिंदे (वय ३५, रा. धनकवडी) यांनी आळंदी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. योगेश शिंदे यास घरगुती तसेच पती पत्नीच्या भांडण्याच्या कारणावरुन त्रास दिला जात होता. तसेच तनिष्क सावली सोसायटीचा चेअरमन असताना त्याच्याकरवी फ्लॅटधारकांकडून बिल्डिंगचे खाली गाड्यांकरीता पार्किंगची सोय करुन देतो, असे म्हणून प्रत्येकी १ लाख रुपये त्यांच्याकडून घेतले होते. तथापी बिल्डरने पार्किंगची कोणतीही सुविधा उपलब्ध केली नाही. त्याचा मानसिक त्रास (Mental distress) होऊन योगेश याने राहत्या घरी २६ जून रोजी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

Web Title : Pimpri Crime News | 7 people, including builder Mehta, charged with inciting suicide; The deception was made by saying that the parking facility

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pune Crime News | लग्नाच्या आमिषाने तरूणीसोबत केली ‘मज्जा’ अन् दुसरीसोबत केला विवाह, तरूणावर बलात्काराचा FIR

Parenting Tips | मुलांना नकारात्मकतेपासून दूर ठेवा, त्यांना समजून घ्या !

Former Home Minister Anil Deshmukh | मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल, म्हणाले – ‘ते पोलिस अधिकारी निर्दोष कसे असतील?’

Pune Crime News | हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारास गावठी पिस्तुलासह अटक