Pimpri Crime News | ‘बजाज’ मधून निम्म्या किंमतीत गाड्यांचे आमिष पडले साडेसात लाखांना; बजाज कंपनीत अधिकारी असल्याचे सांगून दोघा भावांनी घातला व्यावसायिकाला गंडा

पिंपरी न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pimpri Crime News | बजाज कंपनीत (Bajaj company) मोठा अधिकारी असल्याचे सांगून कंपनीमधून अर्ध्या किंमतीत गाड्या काढून देतो, असे आमिष दाखवून दोघा भावांनी एका व्यावसायिकाला साडेसात लाखांना गंडा घातला. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी (Pimpri Police) अविनाश जाधवाणी (वय २५) आणि आकाश जाधवाणी (वय २१ दोघे रा. सुखवाणी केसल सोसायटी, पिंपरीगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शंकरलाल बखत्यारपुरी (वय ५०, रा. वैभवनगर सोसायटी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार एप्रिल २०२० ते १३ नोव्हेंबर २०२० दरम्यान घडला. Pimpri Crime News | cheating of 6.6 lakh; The two brothers accused the businessman of being an officer in the Bajaj company

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

बखत्यारपुरी हे व्यावसायिक आहेत. अविनाश जाधवाणी याने आपण आकुर्डीतील बजाज कंपनीमध्ये मोठा ऑफिसर असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांना बजाज कंपनीमधून (Bajaj company) अर्ध्या किंमतीमध्ये तुम्हाला ३२ गाड्या काढून देतो, असे आमिष दाखविले. त्यासाठी त्यांच्याकडून ७ लाख ६० हजार रुपये वेळोवेळी घेतले. मात्र, त्यानंतरही त्यांनी ३२ गाड्या दिल्या नाही. वारंवार मागणी केल्यानंतरही पैसे परत न दिल्याने शेवटी बखत्यारपुरी यांनी फसवणुकीची (Fraud) फिर्याद पिंपरी पोलिसांकडे केली.

Web Title : Pimpri Crime News | cheating of 6.6 lakh; The two brothers accused the businessman of being an officer in the Bajaj company

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Koregaon Bhima Inquiry Commission | कोरेगाव भीमा हिंसाचार आयोग साक्षीसाठी शरद पवार यांना बोलवणार; कोरोनामुळे ठप्प झाले होते कामकाज

Health News | जर तुम्हाला लांब आणि मऊ केस हवे असेल तर आजपासून ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, जाणून घ्या

Pune Crime News | ‘बेटर हाफ’ वेबसाईटवरून ओखळ झाल्यानंतर लग्नाच्या अमिषाने 28 वर्षीय तरूणीची 9 लाखांची फसवणूक