Pimpri Crime News | पिंपरी : ‘आमच्याकडे बघून का हसतो’ म्हणत तरुणावर कोयत्याने वार, दोघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Crime News | आमच्याकडे बघून का हसत आहे अशी विचारणा करुन एका मजुराला हाऊस किपींग व्यावसायिकाने व सिक्युरिटी गार्डने कोयत्याने सपासप वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि.21) रात्री सव्वा बाराच्या सुमारास मुंबई-पुणे हायवे (Mumbai Pune Highway) लगत असलेल्या शिवराज हॉटेलमध्ये घडली आहे. याप्रकरणी रावेत पोलिसांनी (Ravet Police) दोघांना अटक केली आहे.

याबाबत मोहीत टुनटून सिंग (वय-23 रा. साई कॉलनी, चिंचवड) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन हाऊस किपींग व्यावसायिक तुषार वैजनाथ सोनवणे (वय-23 रा. दर्शन पार्क सोसायटी, औंध), सिक्युरीटी गार्ड वैभव उल्हास शिंदे (वय-26 रा. गायकवाड नगर, पुनावळे) यांच्यावर आयपीसी 307, 504, 506, 34 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.(Pimpri Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहीत सिंग हा त्यांच्या इतर दोन मित्रांसोबत शिवराज हॉटेलमध्ये जेवण करत होते.
त्यावेळी गप्पा गोष्टी करत हसत जेवण करत होते. यावेळी आरोपी हे जवळच्या दुसऱ्या टेबलवर बसले होते.
तु आमच्याकडे बघुन का हसत आहेस? अशी विचारणा करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
तसेच त्यांच्या जवळ असलेल्या कोयत्याने फिर्यादी मोहीत याच्या डोक्यात, हातावर, गालावर व छातीवर सपासप वार करुन
जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मोहीत याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पुढील तपास रावेत पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On Baramati Lok Sabha | बारामतीत सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यास तुमचे राजकीय करिअर धोक्यात येईल का? अजित पवार म्हणाले…

Pune Lok Sabha | पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ गुरुवारी भरणार अर्ज ! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती, जंगी रॅली, भव्य सभा घेणार