Pimpri Crime | सेट्रींगचे काम करताना चौथ्या मजल्यावरुन पडून कामगाराचा मृत्यु

पिंपरी न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pimpri Crime | आकुर्डी (Akurdi) येथील मयुर समृद्धी फेज २ येथे सेंट्रींगचे काम करीत असताना चौथ्या मजल्यावरुन पडून एका कामगाराचा मृत्यु (Worker dies) झाला. Pimpri Crime | Worker dies after falling from fourth floor while setting

मुन्ना धरमदेव महतो (वय २१, रा. औहुरा, बिहार) असे या कामगाराचे नाव आहे.
याप्रकरणी निगडी पोलिसांनी (Nigdi police) बसवराज चंद्रम दुदगी (वय ४२, रा. जाधववाडी, चिखली) या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार धुमाळ (Assistant Inspector of Police Vijay Kumar Dhumal) यांनी निगडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
आकुर्डी गावठाणातील मयुर समृद्धी फेज २ येथे सेंट्रींगचे काम सुरु होते. या कामाचा ठेका बसवराज दुदगी याने घेतला होता.
सेंट्रींग ठेकेदार दुदगी याने सुरक्षेविषयी कोणतीही उपाय योजना कामाच्या ठिकाणी घेतली गेली नव्हती. त्यामुळे १२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सेंट्रींगचे काम करीत असताना मुन्ना महतो हा चौथ्या मजल्यावरुन खाली पडून जखमी झाला.
त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
तेथे उपचार सुरु असताना दुपारी ३ वाजता त्याचा मृत्यु झाला.
सुरक्षा साधने कामगाराला न पुरविल्याने त्याच्या मृत्युस कारणीभूत झाल्याने ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title : Pimpri Crime | Worker dies after falling from fourth floor while setting

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

CM Uddhav Thackeray | काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेवरून मुख्यमंत्री ठाकरेंनी लगावला टोला; म्हणाले…

Indurikar Maharaj | ‘दारूची दुकानं अन् सर्व काही सुरू, फक्त देवाची मंदिरे बंद असल्यानं वाईट वाटतं’ – इंदुरीकर महाराज

Yoga For Lungs | फुफ्फुस निरोगी राहील, कोणतीही समस्या उद्भवणार नाही; ‘ही’ 5 आसने करा