Pimpri Crime | भक्ती-शक्ती पुलावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

पिंपरी न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pimpri Crime | भरधाव वेगात जाणाऱ्या मालवाहू ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात (Accident) दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला होता. तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज (मंगळवार) त्याचा मृत्यू झाला. हा अपघात निगडी येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज भक्ती-शक्ती पुलावर (Bhakti Shakti Bridge) रविवारी (दि.11) झाला होता. Pimpri Crime | youth died saint tukaram maharaj bhakti shakti bridge

ओमकार शिवाजी खाडे (Omkar Khade) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी ओंकार भक्ती-शक्ती पुलावरून निगडीवरुन देहुरोडच्या दिशेने जात होता. त्याच्या मागे एक दुचाकी होती. एका मालवाहू ट्रकच्या चालकाचे वाहनावरील ताबा सुटल्याने दोन दुचाकींना पाठीमागून जोरात धडक बसली.

या अपघातात दोन दुचाकीवरील तीन युवक गंभीर जखमी झाले होते. दोन जणांना वायसीएम रुग्णालयात (YCM Hospital) दाखल करण्यात आले होते. ओंकार खाडेला पिंपरीमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास निगडी पोलीस (Nigdi police) करित आहेत.

Web Title : Pimpri Crime | youth died saint tukaram maharaj bhakti shakti bridge

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pune Serum Institute News | ‘सीरम’ची मोठी घोषणा ! तिसरी लस देखील पुण्यातच तयार होणार; सप्टेंबरपासून स्पुटनिक- V लसीचे उत्पादन

Newborn Baby Died | Australia मध्ये Doctors च्या निष्काळजीपणामुळे गेला नवजात बाळाचा जीव; Oxygen च्या ऐवजी दिला Laughing Gas

Pune Crime | खुनाच्या गुन्हयात फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक